राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दिल्या उपराष्ट्रपतींना वाढदिवसाच्या शुभेच्छा
नवी दिल्ली, ०४ मे (हि.स.)। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती मुर्मू यांनी ‘एक्स’वर आपल्या संदेशात उपराष्ट्रपतींच्या उत्तम आरोग्य
President and Prime Minister Extend Birthday Wishes to Vice President Radhakrishnan


नवी दिल्ली, ०४ मे (हि.स.)। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती मुर्मू यांनी ‘एक्स’वर आपल्या संदेशात उपराष्ट्रपतींच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेसाठी अविरत ऊर्जा मिळो, अशी कामना व्यक्त केली.

तर पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, उपराष्ट्रपती देशाला ‘विकसित भारत’ बनविण्याच्या सामूहिक संकल्पाला बळकटी देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांनी सांगितले की, संसदेची कार्यवाही अधिक प्रभावी आणि फलदायी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न लोकशाही मूल्यांप्रती त्यांच्या दृढ बांधिलकीचे द्योतक आहेत.

पंतप्रधानांनी उपराष्ट्रपतींच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या समर्पणाची तसेच गरीब आणि वंचित घटकांप्रती त्यांच्या संवेदनशीलतेची प्रशंसा करत ते प्रेरणादायी असल्याचे म्हटले. त्यांनी पुढे सांगितले की, त्यांचे सार्वजनिक जीवन समर्पण, शिस्त आणि स्पष्ट उद्दिष्टांनी प्रेरित राहिले आहे. मोदींनी उपराष्ट्रपतींच्या उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देत देशसेवेत त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानाचे कौतुक केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande