चीनमधील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; २६ जणांचा मत्यू, ६१ हून अधिक जखमी
बीजिंग , 05 मे (हिं.स.)।मध्य चीनमधील हुनान प्रांतातील लियुयांग शहरात सोमवारी सायंकाळी एक मोठी दुर्घटना घडली. येथे एका फटाका कारखान्यात भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत किमान २६ जणांचा मृत्यू झाला असून ६१ जण जखमी झाले आहेत. हा स्फोट सोमवारी सायंकाळी सु
चीनमधील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; २६ जणांचा मत्यू, ६१ हून अधिक जखमी


बीजिंग , 05 मे (हिं.स.)।मध्य चीनमधील हुनान प्रांतातील लियुयांग शहरात सोमवारी सायंकाळी एक मोठी दुर्घटना घडली. येथे एका फटाका कारखान्यात भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत किमान २६ जणांचा मृत्यू झाला असून ६१ जण जखमी झाले आहेत. हा स्फोट सोमवारी सायंकाळी सुमारे ४:४० वाजता हुनान प्रांतातील लियुयांग येथे असलेल्या ‘हुआशेंग फायरवर्क्स मॅन्युफॅक्चरिंग अँड डिस्प्ले कंपनी’च्या एका कार्यशाळेत झाला. हे ठिकाण मोठ्या प्रमाणावर फटाक्यांच्या उत्पादनासाठी ओळखले जाते.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या घटनेची दखल घेत बचाव आणि मदत कार्य वेगाने करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आणि जखमींना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये स्फोटानंतर घटनास्थळावरून दाट पांढऱ्या धुराचे मोठे ढग उठताना दिसत आहेत. स्थानिक अधिकारी स्फोटाच्या कारणांचा तपास करत आहेत.

सरकारी वृत्तसंस्थानुसार, घटनास्थळी सुमारे ५०० बचाव कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मदत व बचाव कार्य सुरू आहे. तसेच जवळच असलेल्या दोन दारूगोळा गोदामांमुळे उच्च धोका लक्षात घेऊन धोकादायक परिसरातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande