धाराशिव - वैद्यकीय विद्यार्थ्यांना ज्ञानभेट ; बालरोग परिषदेकडून २५० हून अधिक पुस्तके प्रदान
धाराशिव, 06 मे (हिं.स.)। वाचन संस्कृतीला चालना देत वैद्यकीय शिक्षण अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने बालरोग परिषद, धाराशिव शाखेकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथे पुस्तके भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. आयोजित या कार्यक्र
धाराशिव - वैद्यकीय विद्यार्थ्यांना ज्ञानभेट ; बालरोग परिषदेकडून २५० हून अधिक पुस्तके प्रदान


धाराशिव, 06 मे (हिं.स.)।

वाचन संस्कृतीला चालना देत वैद्यकीय शिक्षण अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने बालरोग परिषद, धाराशिव शाखेकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथे पुस्तके भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

आयोजित या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या ग्रंथालयासाठी बालरोग विषयक महत्वाची व उपयुक्त अशी एकूण २५० हून अधिक पुस्तके प्रदान करण्यात आली.या पुस्तकांमुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना तसेच निवासी डॉक्टरांना अभ्यासासाठी मोलाची सहाय्यता होणार असल्याचे सांगण्यात आले.

या कार्यक्रमास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान,वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. प्रवीण डुमणे,बालरोग विभागप्रमुख डॉ.शाम चौधरी,डॉ.घोगरे,डॉ. निलोफर भोरी तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय सोनटक्के,डॉ. बागल,डॉ.देशमुख आणि ग्रंथपाल श्री. निलेश खोलासे यांची उपस्थिती होती.

महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान यांनी बालरोग परिषद, धाराशिव शाखेचे आभार मानत सांगितले की,अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होते आणि त्यांच्या सर्वांगीण ज्ञानविकासास मदत होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande