
छत्रपती संभाजीनगर, 06 मे (हिं.स.)। केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेत हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रम बरगढ (ओडीशा) येथे शिकविला जातो. त्यासाठी महाराष्ट्र राज्यासाठी १३ + १ जागा आहेत. या अभ्यासक्रमासाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, बाळासाहेब पवार सहकार भवन, तिसरा मजला, जाफर गेट, छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत विहीत नमुन्यात दि.१० जून पर्यंत प्रवेश मागविण्यात आले आहेत.
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज विहित नमुन्यात प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग आयुक्तालय यांच्याकडे सादर करावे. प्रवेश अर्जाचा नमूना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे http.www.dirtexmah.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्जाचा नमूना व प्रवेश प्रक्रियेची माहिती सर्व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोउद्योग कार्यालयात उपलब्ध आहे,अशी माहिती वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis