परभणीत भाजपची भव्य जिल्हास्तरीय बैठक; आगामी अभियानांसाठी रणनीती निश्चित
परभणी, 06 मे (हिं.स.)। भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय बैठक शहरातील सावली विश्रामगृह येथे उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या बैठकीत पक्षाच्या आगामी अभियानांचे नियोजन, संघटन बळकटीकरण आणि कार्यपद्धतीवर सखोल चर्चा करण्यात आली
अ


परभणी, 06 मे (हिं.स.)। भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय बैठक शहरातील सावली विश्रामगृह येथे उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या बैठकीत पक्षाच्या आगामी अभियानांचे नियोजन, संघटन बळकटीकरण आणि कार्यपद्धतीवर सखोल चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आणि सकारात्मक प्रतिसाद ही बैठकीची विशेष वैशिष्ट्ये ठरली.

बैठकीत परभणी जिल्हा प्रभारी प्रवीणजी घुगे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आगामी कामकाजासाठी स्पष्ट दिशा दिली. संघटन अधिक मजबूत करण्यासाठी नियोजनबद्ध काम, कार्यकर्त्यांमधील संवाद वाढवणे आणि प्रत्येकाने सक्रिय भूमिका घेण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी भाजप परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, प्रमोद वाकोडकर, मीनाताई परतानी, मोकिंद खिल्लारे, सुनील देशमुख, मंगलताई मुदगलकर, मनीषा जाधव, डॉ. केदार खटिंग यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत आगामी अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने आणि कटिबद्धतेने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. संघटन अधिक बळकट करून जनतेपर्यंत पक्षाचे विचार प्रभावीपणे पोहोचवण्यावर भर देण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande