भारती फुलमाळी भारतीय महिला क्रिकेट संघात, अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा
अमरावती, 06 मे (हिं.स.) येथील प्रतिभावान खेळाडू भारती फुलमाळी हिची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या टी-२० वर्ल्ड कप संघात निवड झाली आहे. हे सामने १२ जून ते ५ जुलै दरम्यान इंग्लंड येथे होणार आहे. या निवडीमुळे संपूर्ण अमरावतीकरांमध्ये आनंद आणि अभिमानाच
भारती फुलमाळी भारतीय महिला क्रिकेट संघात अमरावतीच्या शिरपेचात आणखी तुरा


अमरावती, 06 मे (हिं.स.)

येथील प्रतिभावान खेळाडू भारती फुलमाळी हिची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या टी-२० वर्ल्ड कप संघात निवड झाली आहे. हे सामने १२ जून ते ५ जुलै दरम्यान इंग्लंड येथे होणार आहे. या निवडीमुळे संपूर्ण अमरावतीकरांमध्ये आनंद आणि अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.

भारती फुलमाळी हिला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. सुरुवातीला मुली क्रिकेट खेळत नसल्यामुळे तीने मुलांसोबत खेळत आपली क्षमता सिद्ध

केली. २०१९ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतर ती संघातून बाहेर पडली. मात्र हार न मानता तिने पुन्हा मेहनतीच्या जोरावर पुन्हा संघात स्थान मिळविले. भारतीय संघात निवड होणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. वर्ल्ड कपमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने मी आनंदी आहे. माझे कुटुंब, प्रशिक्षक या सर्वांनी दिलेल्या पाठिंबामुळेच मला पुढे जाता आले. आता वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल. तिचे वडील श्रीकृष्ण फुलमाळी हे शिक्षक आहे. त्यांचे प्रोत्साहन आणि आई व दोघी बहिणी पाठीशी असल्यामुळे मी क्रिकेटमध्ये ओळख निर्माण करू शकली, असे तिने सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande