परभणी - सभापती रईस खान यांनी स्विकारला पदभार
परभणी, 06 मे (हिं.स.)। परभणी महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ''अ'' चे नूतन सभापती रईस खान यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारला. यावेळी महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख, सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजू लाला, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, सामा
परभणी - सभापती रईस खान यांनी स्विकारला पदभार


परभणी, 06 मे (हिं.स.)। परभणी महानगरपालिकेच्या प्रभाग समिती 'अ' चे नूतन सभापती रईस खान यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारला.

यावेळी महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख, सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजू लाला, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते सय्यद कादर, अमित पाचलिंग, सुनील देशमुख, व्यंकट डहाळे, अलिमोद्दीन काझी यांनी सभापती रईस खान यांचा सत्कार केला. यावेळी महापौर यांनी प्रशासन काळामध्ये विकास कामाला गती नव्हती, आता संपूर्ण महापालिकेमध्ये सर्व विभागाचे सभापती यांनी पदभार स्विकारला आहे. आता विकास कामाला गती येणार, नागरीकांचे मूलभूत प्रश्न मार्गी लागतील असे सांगून सभापती यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी नूतन सभापती रईस खान यांनी प्रभागातील अधिकारी, कर्मचारी यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी नागरीकांचे मूलभूत प्रश्न स्वच्छता आरोग्य, पाणी पुरवठा यांसारखे प्रश्न मार्गी लावणार व नागरीकांना सुविधा उपलब्ध करुन देणार, नागरीकांना भेटण्यासाठी दुपारी ३ ते ५ या वेळेत नागरीकांचे प्रश्न सोडविणार, माझ्यावर जो विश्वास टाकला खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख व गटनेते दिलीप ठाकूर यांनी माझ्यावर विश्वास टाकला त्याला तडा जाऊ देणार नाही, असे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande