छ. संभाजीनगर - शिक्षक भरतीच्या नियमांमध्ये बदल; उमेदवारांना मोठी संधी
छत्रपती संभाजीनगर, 06 मे, (हिं.स.)। दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मेगा भरतीला गती देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यासाठी ३१ मे पर्यंत सर्व रिक्त पदांच्या जाहिराती ''पवित्र'' पोर्टलवर प्रसिद्ध करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. विशेष म्हणजे सध्याच
छ. संभाजीनगर - शिक्षक भरतीच्या नियमांमध्ये बदल; उमेदवारांना मोठी संधी


छत्रपती संभाजीनगर, 06 मे, (हिं.स.)। दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मेगा भरतीला गती देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यासाठी ३१ मे पर्यंत सर्व रिक्त पदांच्या जाहिराती 'पवित्र' पोर्टलवर प्रसिद्ध करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. विशेष म्हणजे सध्याच्या रिक्त पदांसोबतच येत्या काही महिन्यांत निवृत्त होणाऱ्या शिक्षकांमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य जागांचाही या प्रक्रियेत समावेश करण्यात येणार असल्याने पदसंख्येमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यंदाच्या भरतीत केवळ अस्तित्वातील रिक्त पदेच नव्हे, तर मे २०२६ पर्यंत निवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या जागांचाही विचार करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध होऊन उमेदवारांसाठी संधी विस्तारणार आहे.

'राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय अत्यंत सकारात्मक असून, शिक्षक भरती प्रक्रियेला पारदर्शक आणि वेगवान स्वरूप मिळणार आहे. संभाव्य रिक्त पदांचा समावेश केल्यामुळे अधिक उमेदवारांना संधी मिळेल. शाळांमधील शिक्षक तुटवडा कमी होऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला निश्चितच चालना मिळेल.

--------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande