
परभणी, 06 मे (हिं.स.)। परभणी महानगरपालिकेचे उपमहापौर गणेश देशमुख यांच्या नवीन दालनाचे उत्साहात लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाला महापौर सय्यद इकबाल, आयुक्त नितीन नार्वेकर, उपमहापौर गणेश देशमुख यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजू लाला, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते सय्यद कादर, अमित पाचलिंग, सुनील देशमुख, व्यंकट डहाळे, अलिमोद्दीन काझी, नदीम इनामदार, गटनेते दिलीप ठाकूर, शुभम पाष्टे, अमोल जाधव, शेख हुसेना बानो शेख हबीब, बागवान मोहम्मद युसूफ मोहम्मद इब्राहीम, शरफोद्दीन सिद्दीकी, माजी सभापती अतूल सरोदे, गटनेते गुलमीर खान, जाकीर बेगम मोहम्मद नईमोद्दीन, विकास राजापूरे, गटनेते सागर गंगाळे, सफीया बेगम, शाम खोबे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी उपमहापौर गणेश देशमुख यांना शुभेच्छा देत नवीन दालनातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यास अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis