
धुळे, 06 मे (हिं.स.) देवपूर परिसरातील सुशिनाल्यावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई महापालिका आणि महसुल विभागाने सलग दुसर्या दिवशी देखील सुरु ठेवली. सकाळ पासूनच प्रचंड पोलीस बंदोबस्तात नाल्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा ठरणारी घरे, बांधकामे तसेच पत्री शेड बुलडोझरच्या सहाय्याने हटवण्यात येत आहे. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडून कारवाईवर स्टे मिळाल्याचे म्हटले जात असले तरी त्या ८२ घरांना वगळून उर्वरित अतिक्रमण निष्काशीत केले जात असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
देवपूरातील सुशीनाला, लाला सरदार नगर, मदनीनगर परिसरातील अनधिकृत बांधकामे हटविण्याची मागणी आमदार अनुप अग्रवाल यांनी विधानसभेत करीत महसुल मंत्र्यांकडे त्यासाठी मागणी लावून धरली होती. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सुशिनाल्यावरील नैसर्गिक प्रवाहातील अडथळे निर्माण करणारे पुर रेषेतील अतिक्रमण निष्काशित करण्याबाबतचे निर्देश महसुल विभागासह महापालिकेला दिले होते. त्यानूसार महापालिकेच्या तसेच महसुल विभागाच्या पथकांनी संयुे कारवाई करीत सुशिनाल्यावरील हद्द मोजमाप केली. तसेच काल मंगळवार पासून प्रत्यक्षात अतिक्रमणे निष्काशीत करण्याची कारवाई सुरु करण्यात आली. सुमारे २५० घरे आणि बांधकामे हटवण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विरोधी पथकाकडून सांगण्यात आले. काल दिवसभरात मनपाच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने सुमारे ५० घरे हटवली होती. दरम्यान या भागातील रहिवाशी मुस्ताक बेग, जहूर बेग व इतर ८१ रहिवाशांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठात धाव घेतली. या प्रकरणी मंगळवारी कामकाज देखील झाले आणि याचिकाकत्यारच्या बांधकामांवर कारवाई करण्यास स्टे दिल्याचे सांगण्यात येत होते. याचिकाकत्यारचे वकील जे.एम. मुरकुटे यांनी खंडपीठाने दिलेल्या निर्देशाविषयीची प्रत बुधवारी मिळण्याची श३यता असल्याचे म्हटले असून प्रशासनाने त्या ८२ घरांना वगळून उर्वरित अतिक्रमणावर कारवाई सुरु ठेवण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. आज बुधवारी सकाळी पुन्हा पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरु करण्यात आली. सुशी नाल्यावरील पुलाकडील भागात तसेच लाला सरदार नगरकडील नाल्या किनारची घरे काढण्याचे काम सुरु करण्यात आले. अनेकांनी आपले नुकसान टाळण्यासाठी स्वत...हून घरे खाली केली तसेच साहित्य हटवले. या कारवाई वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यात प्रामुख्याने एल एम सरदार हायस्कूलच्या पाठीमागे असलेल्या सुशीला नाला अतिक्रम काढण्याची कारवाई सुरु होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर