
छत्रपती संभाजीनगर, 06 मे (हिं.स.)। क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत मिश्न लक्ष्यवेध योजनेअंतर्गत कुस्ती व लॉन टेनिस खेळांसाठी विभागीय निवड चाचण्या शुक्रवार दि.८ मे रोजी विभागीय क्रीडा संकूल छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे,असे क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांनी कळविले आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत मिशन लक्ष्यवेध योजना ही धोरणात्मक योजना राबविण्यात येत आहे. या जनेतंर्गत लॉन टेनिस, कुस्ती, बॅडमिंटन आणि बॉक्सिंग या क्रीडा प्रकाराकरीता विभागीय क्रीडा निपुणता केंद्र विभागीय क्रीडा संकुल, छत्रपती संभाजीनगर येथे स्थापन करण्यात येत आहे. या केंद्रांमध्ये निवड झालेल्या खेळाडूंना निवासी स्वरूपात दर्जेदार व तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण, क्रीडा साहित्य, निवास व भोजन सुविधा तसेच क्रीडा विज्ञान विषयक सहाय्य, देश विदेशातील क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग व खेळाडूंसाठी वैद्यकीय विमा सुरक्षा सुविधा शासन मान्यतेनुसार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
उपरोक्त नमुद विभागीय क्रीडा निपुणता केंद्र विभागीय क्रीडा संकुल, छत्रपती संभाजीनगर येथे कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने कुस्ती व लॉन टेनिस या खेळांसाठी खेळाडूंच्या निवड चाचण्यांचे आयोजन शुक्रवार दि.८ मे रोजी विभागीय क्रीडा संकुल येथे करण्यात आले आहे.
खेळाडू निवड चाचणी करीता निकष खालीलप्रमाणे:
१. लॉन टेनिस : वयोमर्यादा २५ वर्षाआतील मुले/मुली (त्या वर्षाच्या ३१ डिसेंबर रोजी), आवश्यक कागदपत्रे- जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, गत २ वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटोग्राफ ३, शाळा / महाविद्यालय बोनाफाईड प्रमाणपत्र, पालकाचे संमती पत्र इ. महाराष्ट्र राज्यातील खेळाडू असला पाहिजे. क्रीडा कामगिरी विवरण-Top ३ Rank Players in AITA, National Ranking Player, राज्यस्तरावरील पदक प्राप्त खेळाडू किंवा राष्ट्रीयस्तरावरील सहभागी खेळाडू (SGFI, AITA, Khelo India National Only) गत २ वर्षाच्या क्रीडा कामगिरीचे मुल्यमापन करण्यात येऊन क्रीडा कौशल्य व तंदुरुस्ती (Fitness) चाचण्यांमध्ये पात्र होणे आवश्यक. शासन मान्यताप्राप्त डॉक्टराकडून दिलेले वैध वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य
२. कुस्ती : वयोमर्यादा २५ वर्षाआतील मुले/मुली (त्या वर्षाच्या ३१ डिसेंबर रोजी), आवश्यक कागदपत्रे- जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, गत २ वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटोग्राफ ३, शाळा / महाविद्यालय बोनाफाईड प्रमाणपत्र, पालकाचे संमती पत्र इ. महाराष्ट्र राज्यातील खेळाडू असला पाहिजे. क्रीडा कामगिरी विवरण-राज्यस्तरावरील पदक प्राप्त खेळाडू किंवा राष्ट्रीयस्तरावरील सहभागी खेळाडू (SGFI, WFI, Khelo India National Only) गत २ वर्षाच्या क्रीडा कामगिरीचे मुल्यमापन करण्यात येऊन क्रीडा कौशल्य व तंदुरुस्ती (Fitness) चाचण्यांमध्ये पात्र होणे. शासन मान्यताप्राप्त डॉक्टराकडून दिलेले वैध वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य.
नैपूण्यप्राप्त खेळाडूंनी चाचण्यांसाठी उपस्थित रहावे,असे आवाहन उपसंचालक शेखर पाटील यांनी केले आहे.
निवड चाचणीचे ठिकाण :
विभागीय क्रीडा संकुल,
सुतगिरणी चौक, छत्रपती संभाजीनगर-४३१००९
निवड चाचणीची वेळ:
शुक्रवार दि.८ मे, सकाळी १० वा. पासून, उपस्थिती : सकाळी साडेनऊ वाजता
संपर्क क्रमांक: तेजस कुलकर्णी (क्रीडा अधिकारी)-८०८७६६१५८९
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis