परभणी - जनता दरबारात मतदारसंघातील नागरिकांनी मांडल्या समस्या
परभणी, 06 मे (हिं.स.)। पाथरी येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या विश्वासाने आपापल्या समस्या व अडचणी मांडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश विटेकर यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रत्येकाच्या
अ


परभणी, 06 मे (हिं.स.)। पाथरी येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या विश्वासाने आपापल्या समस्या व अडचणी मांडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश विटेकर यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रत्येकाच्या डोळ्यात अपेक्षा होती आणि त्या अपेक्षांना न्याय देणे हीच माझी जबाबदारी आहे, याची पुन्हा एकदा जाणीव झाली. असे आमदार विटेकर यांनी सांगितले

जनतेचा हा विश्वास माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. प्रत्येक तक्रारीची नोंद घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना दिल्या असून, सर्व प्रश्नांवर लवकरात लवकर ठोस उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आपल्या मतदार संघाचा सर्वांगीण विकास आणि प्रत्येक नागरिकाचे समाधान हेच माझे ध्येय आहे. जनता दरबार हा फक्त समस्या ऐकण्याचा नाही, तर त्या सोडवण्याचा एक दुवा आहे. असेही आमदार विटेकर म्हणाले

यावेळी जिल्हा परिषद सदस्य मदनराव भोसले - विटेकर, बाळासाहेब कोल्हे, सभापती अनिलराव नखाते, सभापती राम डुकरे, उपसभापती सचिन अंभुरे, पंचायत समिती सदस्य सुभाष दुगाने, नागोराव ढगे, किशन घांडगे, भगवान दुगाने, गटविकास अधिकारी शैलेश वावळे, संजय काका रणेर, उप जिल्हाध्यक्ष राजेश ढगे, तालुकाध्यक्ष अविराज टाकळकर, युवक अध्यक्ष संतोष कोल्हे यांच्यासह सर्व सरपंच उपसरपंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande