खाटू श्याम-अजमेरसाठी आता नियमित ट्रेन, खान्देशातील भाविकांना दिलासा
जळगाव, 06 मे (हिं.स.)राजस्थानमधील प्रसिद्ध खाटू श्याम आणि अजमेर शरीफ दर्ग्याच्या दर्शनासाठी जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यासह खान्देशातून भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या प्रतिसादाची दखल घेत रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. काकीनाडा
खाटू श्याम-अजमेरसाठी आता नियमित ट्रेन, खान्देशातील भाविकांना दिलासा


जळगाव, 06 मे (हिं.स.)राजस्थानमधील प्रसिद्ध खाटू श्याम आणि अजमेर शरीफ दर्ग्याच्या दर्शनासाठी जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यासह खान्देशातून भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या प्रतिसादाची दखल घेत रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. काकीनाडा टाऊन–हिसार विशेष एक्स्प्रेस नियमित सेवेच्या रुपात धावणार आहे. यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.पूर्वी खाटू श्याम (रींगस जंक्शन) किंवा अजमेरला जाण्यासाठी खान्देशातील नागरिकांना खाजगी बसचा महागडा प्रवास करावा लागायचा किंवा अनेक रेल्वे गाड्या बदलाव्या लागायच्या. मात्र, आता काकीनाडा–हिसार ही स्वतंत्र रेल्वे सुरू झाल्याने प्रवासाचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि कुटुंबांसह प्रवास करणाऱ्यांसाठी ही सेवा वरदान ठरत आहे.

या रेल्वे गाडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे भुसावळ व जळगाव या मुख्य स्थानकांबरोबरच जळगाव जिल्ह्यातील धरणगाव आणि अमळनेर या स्थानकांवरही या गाडीला अधिकृत थांबा देण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यासह खान्देशातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहेसध्या धावणारी ०७७१७/०७७१८ ही विशेष साप्ताहिक ट्रेन आता नवीन क्रमांकासह नियमित एक्स्प्रेस म्हणून धावणार आहे. विशेष गाड्यांचे नियमित सेवेत रुपांतर झाल्यानंतर गाडी क्रमांक १७२९५ काकीनाडा टाऊन ते हिसार साप्ताहिक एक्स्प्रेस आता १२ मेपासून काकीनाडा टाऊन येथून तसेच गाडी क्रमांक १७२९६ हिसार ते काकीनाडा टाऊन साप्ताहिक एक्स्प्रेस १५ मेपासून हिसार येथून धावणार आहे.पैकी १७२९५ एक्स्प्रेस दर मंगळवारी काकीनाडा टाऊन येथून ०५.४० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी हिसार येथे १०.२० वाजता पोहचेल. १७२९६ एक्स्प्रेस दर शुक्रवारी हिसार येथून दुपारी ०२.१० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी काकीनाडा टाऊन येथे रात्री ०९.३५ वाजता पोहचेल. दोन वातानुकूलित प्रथम, तीन वातानुकूलित द्वितीय, पाच वातानुकूलित तृतीय, आठ शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान आणि गार्ड ब्रेक व्हॅन, अशी डब्यांची रचना असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande