खा. अशोकराव चव्हाण, आ. श्रीजया चव्हाण यांनी जि. प. कचेरीत घेतली आढावा बैठक
नांदेड, 06 मे, (हिं.स.)। माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण आणि भोकर मतदारसंघाच्या आ. श्रीजया चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच, सर्व
Q


नांदेड, 06 मे, (हिं.स.)। माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण आणि भोकर मतदारसंघाच्या आ. श्रीजया चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच, सर्व प्रलंबित विकासकामे विहित मुदतीत आणि वेगाने पूर्ण करण्यासंदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवश्यक सूचनाही त्यांनी दिल्या.

या बैठकीत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या समीक्षा अंमलबजावणीची करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने जलजीवन मिशन, वॉटर ग्रीड योजना, रस्ते विकास, पाणंद रस्ते, शिक्षण व सार्वजनिक आरोग्य सुविधा आणि रोजगार हमी योजनेच्या कामांचा समावेश होता. खा. अशोकराव चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांनी संबंधित कामांच्या प्रगतीची सद्यस्थिती आणि त्यातील अडचणींची विस्तृत माहिती जाणून घेतली.

या आढावा बैठकीला अर्धापूरचे भाजपा तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे, भोकरचे तालुकाध्यक्ष दिवाकर रेड्डी, मुदखेडचे तालुकाध्यक्ष दत्तू देशमुख वाडीकर यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande