इराणमधील शॉपिंग सेंटरला भीषण आग; ८ जणांचा मृत्यू, ४० जखमी
तेहरान, 06 मे (हिं.स.)।इराणची राजधानी तेहरानजवळील एका शॉपिंग सेंटरमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ४० जण जखमी झाले आहेत. ही माहिती आपत्कालीन सेवा विभागाने दिली आहे. मंगळवारी तेहरान प्रांतातील अंदि
इराणमधील शॉपिंग सेंटरला भीषण आग; ८ जणांचा मृत्यू, ४० जखमी


तेहरान, 06 मे (हिं.स.)।इराणची राजधानी तेहरानजवळील एका शॉपिंग सेंटरमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ४० जण जखमी झाले आहेत. ही माहिती आपत्कालीन सेवा विभागाने दिली आहे.

मंगळवारी तेहरान प्रांतातील अंदिशेह शहरात असलेल्या ‘अरघवन शॉपिंग सेंटर’मध्ये ही आग लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून त्याची चौकशी सुरू आहे. सरकारी दूरदर्शनच्या माहितीनुसार, संबंधित यंत्रणा आगीमागील कारणांचा शोध घेत आहेत.

टीव्ही फुटेजमध्ये बहुमजली इमारतीतून मोठ्या प्रमाणात काळा धूर उसळताना दिसत होता आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. आग इतकी भीषण होती की संपूर्ण परिसरात धूर पसरला, त्यामुळे बचावकार्यालाही अडचणी निर्माण झाल्या.

अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की या आगीचा अलीकडेच अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या तणाव किंवा युद्धाशी कोणताही संबंध नाही. दोन्ही देशांमध्ये सुमारे तीन आठवड्यांपासून संघर्षविराम लागू असून ही घटना त्याच्याशी संबंधित नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande