नाशिकमध्ये १४ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार - मंत्री उदय सामंत
नाशिक, 06 मे (हिं.स.)। सामंजस्य करार करण्यात महाराष्ट्र देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात पुढे असून, वेळ आली तर पुराव्यानिशी सिद्ध करू. मागील वर्षी ओडिशामध्ये १४२ सामंजस्य करार करण्यात आले होते. यंदा यामध्ये वाढ झाली असून ती ३२४ पर्यंत जाणार आ
MoU worth Rs 14,000 crore


नाशिक, 06 मे (हिं.स.)।

सामंजस्य करार करण्यात महाराष्ट्र देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात पुढे असून, वेळ आली तर पुराव्यानिशी सिद्ध करू. मागील वर्षी ओडिशामध्ये १४२ सामंजस्य करार करण्यात आले होते. यंदा यामध्ये वाढ झाली असून ती ३२४ पर्यंत जाणार आहे. केलेल्या या सामंजस्य करारांपैकी ७० ते ८० टक्के पूर्णत्वास आले असून त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत आहे. तसेच नाशिकमध्ये औद्योगिक गुंतवणूक वाढवण्यासाठी कुंभ उद्योग समितीत १४ हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात येत आहेत, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा बुधवारी येथे पार पडला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री सामंत यांनी ही माहिती दिली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, शिवसेना नेते भाऊ चौधरी, आमदार सुहास कांदे, उपमहापौर विलास शिंदे, शिवसेना उपनेते , अजय बोऱस्ते, नगरसेवक बंटी तिदमे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना मंत्री सामंत म्हणाले की, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा आढावा घेण्यात आला असून ग्रामीण भागात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी येत्या काळात प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषदेत शिवसेनेचा भगवा फडकवणार असून या निवडणुकीत महायुती म्हणूनच पुढे जाण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसेच येथे मी स्वतःचा नारा देण्यासाठी आलो नसल्याचेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये दुरावा वाढू नये यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून तिची पहिली बैठक मंगळवारी, दि. ५ मे रोजी मुंबईत झाल्याची माहिती मंत्री सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर पुण्यातील नरसिंहपूर येथे झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराबाबत भाष्य करताना मंत्री सामंत म्हणाले की, महिला अत्याचारांवर कठोर शासन व्हावे, हीच नेहमी राज्य सरकारची भूमिका आहे. असे गुन्हे करणाऱ्यांना ठेचलेच पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यात उद्योगांसाठी जागा अधिग्रहित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. इगतपुरी जवळ महिंद्रा अँड महिंद्रा आपला प्रकल्प सुरू करण्यासाठी इच्छुक असून येथील शेतकऱ्यांनी जागेसाठी 22 लाख रुपये प्रति एकर जी मागणी केली होती त्याबाबत आज बुधवारी नाशिक मध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये नवीन दराप्रमाणे पैसे देण्याचा निर्णय झालेला आहे आता शेतकऱ्यांनी या ठिकाणी सहकार्य करण्याचे आवाहन करत उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, त्यानुसार इगतपुरी, नांदूर, दिंडोरीतील जांभुटके आणि मनमाड येथे एक हजार ५०० एकर जागा संपादित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संबंधितांनी सहकार्य केल्यास लवकरच येथे नवीन उद्योग सुरू होतील, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली.

चौकट

गटबाजी खपवून घेणार नाही कार्यकर्त्यांना इशारा

कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, पक्षामध्ये कुठला गट किंवा तट नाही सर्व गट तट एकत्र आहे पक्ष म्हणजेच शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीची ही शिवसेना आहे त्यामुळे इथे गटाला महत्व नाही पक्षाची विचारसरणी पक्षाची बांधिलकी याला अधिक महत्त्व आहे त्यामुळे जर कोणी असे गट तट करणार असतील तर त्यांना त्या पद्धतीप्रमाणे पक्षीय पातळीवरती उत्तर दिले जाईल आणि अशा गोष्टी कदापिही खपवून घेतल्या जाणार नाही अशा इशारा देखील त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिला.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सामंत यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजे पक्ष वाढविणे हा सर्वांचाच अधिकार आहे असे सांगितले त्यामुळे आपण महायुती किंवा सरकार मध्ये काय घडतं आम्ही काय निर्णय घेतो हे आपण आपल्याला सांगूच परंतु पक्षीय पातळीवरती पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातूनही प्रयत्न करण्याचे मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande