एक दिवस अगोदर प्रस्ताव संबंधित अतिरिक्त महापालिका आयुक्तांकडे सादर करणे बंधनकारक - नवल किशोर राम
पुणे, 06 मे (हिं.स.)। महानगरपालिकेच्या मुख्य सभा तसेच विविध समित्यांच्या बैठकीत आयत्यावेळी सादर होणाऱ्या प्रस्तावांबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही बैठकीत विषय समाविष्ट करण्यासाठी संबंधित विभागाने किम
Naval Kisahor ram


पुणे, 06 मे (हिं.स.)। महानगरपालिकेच्या मुख्य सभा तसेच विविध समित्यांच्या बैठकीत आयत्यावेळी सादर होणाऱ्या प्रस्तावांबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही बैठकीत विषय समाविष्ट करण्यासाठी संबंधित विभागाने किमान एक दिवस अगोदर प्रस्ताव संबंधित अतिरिक्त महापालिका आयुक्तांकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

आयुक्त राम यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.महापालिकेच्या स्थायी समिती, शहर सुधारणा समिती तसेच इतर विषय समित्यांच्या बैठकींमध्ये अनेकदा विभागप्रमुख आयत्यावेळी प्रस्ताव मांडून त्याला तातडीने मान्यता द्यावी, अशी मागणी करतात. यामुळे संबंधित विषयांची पुरेशी माहिती उपलब्ध होत नाही. तसेच बैठकीत या प्रस्तावांबाबत समितीच्या सदस्यांनी त्यावर प्रश्न उपस्थित केल्यास आणि अधिकची माहिती मागितल्यास त्यावर सविस्तर चर्चा करणे अडचणीचे ठरते.

महापालिकेच्या विविध समितीच्या बैठकीमध्ये कार्यपत्रिकेवर कमी विषय मांडून आयत्या वेळेस मोठ्या संख्येने प्रस्ताव मान्यतेसाठी आणून ते मंजूर करून घेण्याचा एक नवीन पायंडा गेल्या काही महिन्यांपासून पडला आहे. या नवीन पद्धतीमुळे महापालिका आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त, लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारे समितीचे सदस्य देखील त्रस्त झाले आहेत. यावरून समितीच्या बैठकांमध्ये प्रशासनाला अनेकदा जाबही विचारण्यात आलेला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande