रत्नागिरी : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी युवकांना सहभागाचे आवाहन
रत्नागिरी, 06 मे (हिं.स.) । केंद्र शासनाच्या महक्त्वाकांक्षी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा तिसरा टप्पा सुरू झाला असून जिल्ह्यातील युवकांना नामांकित कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा तसेच पदवी
रत्नागिरी : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी युवकांना सहभागाचे आवाहन


रत्नागिरी, 06 मे (हिं.स.) । केंद्र शासनाच्या महक्त्वाकांक्षी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा तिसरा टप्पा सुरू झाला असून जिल्ह्यातील युवकांना नामांकित कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा तसेच पदवीधर (बीई, बी.टेकसह) युवक-युवती या योजनेसाठी पात्र आहेत.

या योजनेअंतर्गत १८ ते २५ वयोगटातील पूर्णवेळ शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण किंवा नोकरीत नसलेले तरुण अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना देशातील नामांकित कंपन्यांमध्ये ६ ते ९ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना दरमहा ९ हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार असून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि सुरक्षा विमा योजनेचे संरक्षणही मिळणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ‘Register/Login’ या पर्यायाद्वारे नोंदणी करावी. नोंदणीसाठी आधार क्रमांकाशी मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक असून ओटीपी पडताळणीनंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे.जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घेऊन प्रशिक्षणाची संधी घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त मोरेश्वर दुधाळ यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आवार, नाचणे रोड, रत्नागिरी येथे संपर्क साधावा, असे प्रशासनाने कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande