पुणे जिल्ह्यात ४० खासगी भूमापक नेमणार
पुणे, 06 मे, (हिं.स.)। प्रलंबित मोजणी अर्ज जलदगतीने मार्गी काढण्यासाठी पुणे जिल्ह्यात खासगी संस्थेच्या माध्यमातून आणखी चाळीस भूमापक नेमण्याचा, तसेच आवश्यकता भासल्यास आणखी खासगी भूमापक घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय भूमी अभिलेख वि
पुणे जिल्ह्यात ४० खासगी भूमापक नेमणार


पुणे, 06 मे, (हिं.स.)। प्रलंबित मोजणी अर्ज जलदगतीने मार्गी काढण्यासाठी पुणे जिल्ह्यात खासगी संस्थेच्या माध्यमातून आणखी चाळीस भूमापक नेमण्याचा, तसेच आवश्यकता भासल्यास आणखी खासगी भूमापक घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे.

जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा जलद, पारदर्शी पद्धतीने व्हावा, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित परवानाधारक भूमापक आणि भूमापन एजन्सी नियुक्ती करण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. त्या अंतर्गत पुणे जिल्ह्यात एका एजन्सीमार्फत ५० भूमापकाची नेमणूक केली आहे. परंतु, पुणे शहर आणि जिल्ह्यातील मोजणी प्रलंबित अर्जांची संख्या विचारात घेता, खासगी भूमापकांची संख्या वाढविण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला. त्यात आणखी ४० खासगी भूमापक घेण्यात येणार आहे. त्यामुळे भूमापकांची संख्या दोनशेहून अधिक होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande