पुण्यातील २५ टक्के ‘आरएमसी’ प्रकल्पांना एमपीसीबीने ठोकले टाळे
पुणे, 06 मे (हिं.स.)। पुणे परिसरात गृहप्रकल्पांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यासाठी काँक्रीटचा पुरवठा करणारे रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पही वाढत आहे. अनेक ठिकाणी या प्रकल्पांकडून नियमांचे उल्लंघन सुरू असून, त्यामुळे हवा प्रदूषणात मोठी व
पुण्यातील २५ टक्के ‘आरएमसी’ प्रकल्पांना एमपीसीबीने ठोकले टाळे


पुणे, 06 मे (हिं.स.)। पुणे परिसरात गृहप्रकल्पांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यासाठी काँक्रीटचा पुरवठा करणारे रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पही वाढत आहे. अनेक ठिकाणी या प्रकल्पांकडून नियमांचे उल्लंघन सुरू असून, त्यामुळे हवा प्रदूषणात मोठी वाढ होत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) गेल्या वर्षीपासून पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील २५ टक्क्यांहून अधिक आरएमसी प्रकल्पांना टाळे ठोकले आहे.

आरएमसी प्रकल्पांमुळे होत असलेल्या हवा प्रदूषणाचा मुद्दा वारंवार उपस्थित होत आहे. गेल्या वर्षी वाकड परिसरात नागरिकांनी रस्त्यावर उतरून आरएमसी प्रकल्पांच्या विरोधात आंदोलन केल्याने त्याची तीव्रता समोर आली होती. तसेच, इतरही अनेक ठिकाणी आरएमसी प्रकल्पांमुळे हवा प्रदूषणात वाढ होत असल्याची तक्रारी आहेत. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या वर्षी जानेवारीपासून आरएमसी प्रकल्पांवर कारवाईचे पाऊल उचलले. त्यात आरएमसी प्रकल्पांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. या अंतर्गत आतापर्यंत नियमांचे गंभीर उल्लंघन करणारे ८४ आरएमसी प्रकल्प बंद करण्याची कारवाई करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande