अलिबागमध्ये राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा 2026 उत्साहात
कलेसोबत सामाजिक संदेशही अधोरेखित रायगड, 06 मे (हिं.स.) : अलिबाग येथे पार पडलेल्या ‘राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा 2026’मध्ये कलेचा आविष्कार, सामाजिक जाणीव आणि उत्साहाचा सुंदर संगम पाहायला मिळाला. मुंबईस्थित ‘एकता इंटरप्रायझेस’च्या वर्धापनदिनान
Powerful invention of acting; State level competition celebrated in Alibaug


कलेसोबत सामाजिक संदेशही अधोरेखित

रायगड, 06 मे (हिं.स.) : अलिबाग येथे पार पडलेल्या ‘राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा 2026’मध्ये कलेचा आविष्कार, सामाजिक जाणीव आणि उत्साहाचा सुंदर संगम पाहायला मिळाला. मुंबईस्थित ‘एकता इंटरप्रायझेस’च्या वर्धापनदिनानिमित्त आणि सौ. एकता निखिलेश म्हात्रे यांच्या सौजन्याने तसेच ‘कलारंग’ सांस्कृतिक सामाजिक संस्था, अलिबाग यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुंबई, ठाणे, रायगड आणि छत्रपती संभाजीनगर येथून एकूण 35 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. लहान गटात 18 आणि मोठ्या गटात 17 स्पर्धकांनी सामाजिक, ऐतिहासिक आणि समकालीन विषयांवर प्रभावी एकपात्री सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली.स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक जमाल सय्यद, माजी अध्यक्ष संदीप गोठीवरेकर, विकास पाटील, सिद्धार्थ चौरे तसेच आयोजक एकता म्हात्रे आणि निखिलेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत पार पडले. कलारंग संस्थेचे अध्यक्ष प्रकल्प वाणी यावेळी उपस्थित होते.स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध अभिनेते विकास चव्हाण आणि सागर नार्वेकर यांनी केले.

विजेत्यांचा गौरव

लहान गटात स्मंद कोठेकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. दूर्वा झावरे द्वितीय आणि आराध्य पाटील तृतीय क्रमांकावर राहिले.

मोठ्या गटात सिद्धेश्वर थोरात यांनी प्रथम स्थान पटकावले, तर प्रशांत पाटील आणि निकीता घाग यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. इतर स्पर्धकांना उत्तेजनार्थ आणि विशेष पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले.

कलेसोबत सामाजिक संदेश

या उपक्रमातून केवळ कलेचा उत्सवच नव्हे तर सामाजिक बांधिलकीही अधोरेखित करण्यात आली. जिल्हा रुग्णालयाच्या “एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे” या अभियानांतर्गत जनजागृती करण्यात आली. तसेच लकी ड्रॉद्वारे पुस्तके वाटप करून वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यात आले.

‘कलारंग’ टीमच्या परिश्रमांमुळे ही स्पर्धा यशस्वी ठरली असून, अलिबागच्या सांस्कृतिक चळवळीत हा एक महत्त्वाचा टप्पा ठरल्याचे मानले जात आहे.----------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande