सोलापूर : राधा पाटील यांच्या कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांमध्येच तुंबळ हाणामारी
सोलापूर, 06 मे (हिं.स.)। पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावात आयोजित नृत्य कार्यक्रमात अचानक तुफान राडा उसळल्याची घटना घडली. नृत्यांगना राधा पाटील यांच्या कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांमध्येच तुंबळ हाणामारी झाली असून, यामुळे कार्यक्रम अर्धवट थांबवण्याची
सोलापूर : राधा पाटील यांच्या कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांमध्येच तुंबळ हाणामारी


सोलापूर, 06 मे (हिं.स.)। पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावात आयोजित नृत्य कार्यक्रमात अचानक तुफान राडा उसळल्याची घटना घडली. नृत्यांगना राधा पाटील यांच्या कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांमध्येच तुंबळ हाणामारी झाली असून, यामुळे कार्यक्रम अर्धवट थांबवण्याची वेळ आयोजकांवर आली.

यल्लमादेवीच्या यात्रेनिमित्त गावात राधा पाटील यांच्या नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने तरुणांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. मात्र, कार्यक्रम रंगात आलेला असतानाच काही तरुणांमध्ये किरकोळ वाद झाला. हा वाद क्षणातच चिघळत गेला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, डान्स पाहताना झालेल्या वादातून एकमेकांना बेदम मारहाण करण्यात आली. काहीजण एकमेकांच्या अंगावर धावून जात असल्याचेही पाहायला मिळाले. या गोंधळामुळे कार्यक्रम थांबवावा लागला आणि उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर सुस्ते गावात तणावपूर्ण शांतता पसरली असून, नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यात गोंधळाचे दृश्य स्पष्टपणे दिसत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande