
पुणे, 06 मे, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) जून-जुलैमध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या शुल्कवाढीवर आक्षेप घेण्यात आला आहे.
राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी परीक्षा शुल्क वाढीबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. शासन आदेश आणि कार्यकारी परिषदेच्या सभेतील निर्णयास अनुसरून जून-जुलैमध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेपासून परीक्षा शुल्क सुधारित करण्यात आले आहे.
त्यानुसार दहावीचे नियमित विद्यार्थी, तंत्रविषय विद्यार्थी, खासगी विद्यार्थी यांच्यासाठी निश्चित केलेल्या शुल्कात परीक्षा शुल्क ५७० रुपये, प्रशासकीय शुल्क २० रुपये, गुणपत्रिका शुल्क २० रुपये, प्रमाणपत्र शुल्क २० रुपये, प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क (शास्त्र विषय) १० रुपये, प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क (तंत्र प्रतिविषय) १०० रुपये, खासगी विद्यार्थी नोंदणी शुल्क १११० रुपये, खासगी विद्यार्थी प्रक्रिया शुल्क १०० रुपये, पुन:परीक्षार्थी आणि तुरळक विषय विद्यार्थ्यांसाठी शुल्कात परीक्षा शुल्क ५७० रुपये, प्रशासकीय शुल्क २० रुपये, गुणपत्रिका शुल्क २० रुपये, प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क (शास्त्र विषय) १० रुपये, प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क (तंत्र प्रतिविषय) १०० रुपये, तर श्रेणीसुधार परीक्षेसाठी नियमित किंवा खासगी विद्यार्थी ११३० रुपये, प्रशासकीय शुल्क २० रुपये, गुणपत्रिका शुल्क २० रुपये, प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क (शास्त्र विषय) १० रुपये, प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क (तंत्र प्रतिविषय) १०० रुपये निश्चित करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु