शशी शेखर वेम्पती यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
नवी दिल्ली, 06 मे (हिं.स.)। केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, आपल्या 6 मे 2026 रोजीच्या अधिसूचनेद्वारे, शशी शेखर वेम्पती यांची, सीबीएफसी म्हणजेच केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ते पदावर रूजु होण्याच्य
Shashi Shekhar Vempati Appointed Chairperson Central Board Film Certification


नवी दिल्ली, 06 मे (हिं.स.)। केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, आपल्या 6 मे 2026 रोजीच्या अधिसूचनेद्वारे, शशी शेखर वेम्पती यांची, सीबीएफसी म्हणजेच केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ते पदावर रूजु होण्याच्या दिवसापासून पुढची तीन वर्षे ही जबाबदारी सांभाळतील.

प्रसून जोशी यांची, प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे, जोशी यांनी सीबीएफसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे ते पद रिक्त झाले होते. याच कारणाने वेम्पती यांची रिक्त जागी नेमणूक करण्यात आली.

शशी शेखर वेम्पती यांना प्रसारमाध्यमे, प्रसारण सेवा आणि सार्वजनिक संवाद या क्षेत्रांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे, सीबीएफसी चा कारभार अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande