सुनेत्रा पवार यांनी दिला राज्यसभा खासदारकीचा राजीनामा
नवी दिल्ली, 06 मे (हिं.स.) - राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेत त्यांनी आपले
सुनेत्रा पवार


नवी दिल्ली, 06 मे (हिं.स.) - राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेत त्यांनी आपले राजीनामा पत्र सादर केले. त्यामुळे, उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यापासून त्यांच्या खासदारकीच्या राजीनाम्याची चर्चा होती. मात्र, बारामती विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी झाल्या. त्यानंतर त्यांनी आज आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर अनपेक्षितपणे राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहे.

नियमानुसार दोन्ही सभागृहात निवडून आलेल्या व्यक्तीला एका सभागृहाचा राजीनामा 14 दिवसांच्या आत देणं बंधनकारक असते. त्यामुळेच, आमदारकीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच, त्यांची आपला खासदारकीचा राजीनामा दिला. पवार यांच्या खासदारकीचा कार्यकाळ अद्याप दोन वर्षाचा शिल्लक आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. याठिकाणी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता कायम आहे. लवकरच सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर होईल. दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यापूर्वीच त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हेही खासदार बनले आहेत. गेल्याच महिन्यात पार्थ पवार यांनी राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande