प्रभाग क्र. 19 मधील प्रलंबित कामांची पाहणी करुन ती तातडीने पूर्ण करावीत - ठाणे महापौर
ठाणे, 06 मे (हिं.स) ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 19 मधील रायलादेवी तलाव येथे तातडीने सुरक्षा रक्षक नेमावेत, तसेच शाळा क्र. ३२/१२६ मधील उर्दु माध्यमाची शाळा आठवीपर्यतच असून नववी व दहावीचे वर्ग सुरू तेथील प्राच्य विद्या संस्थेतील जागेची पाहणी क
Thane


ठाणे, 06 मे (हिं.स) ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 19 मधील रायलादेवी तलाव येथे तातडीने सुरक्षा रक्षक नेमावेत, तसेच शाळा क्र. ३२/१२६ मधील उर्दु माध्यमाची शाळा आठवीपर्यतच असून नववी व दहावीचे वर्ग सुरू तेथील प्राच्य विद्या संस्थेतील जागेची पाहणी करुन त्या ठिकाणी सुरू करता येतील का ते पहावे, तसेच प्रभागातील पावसाळ्यापूर्वी आवश्यक असलेली सर्व कामे करण्याच्या सूचना नुकत्याच झालेल्या बैठकीत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी संबंधित विभागाला दिल्या.

प्रभाग क्र. 19 मधील प्रलंबित असलेल्या कामांबाबत स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले, रविंद्र फाटक, मीनल संख्ये यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांची भेट घेतली होती. याबाबत महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली, या बैठकीस उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, उपायुक्त मिताली संचेती, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, सहाय्यक आयुक्त राजेश सोनावणे, सर्व स्थानिक नगरसेवक व विविध विभागांचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत शिक्षण, स्वच्छता, सुरक्षा आणि सुशोभीकरणाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. हाजुरी येथील उर्दु शाळा क्र. ३२/ १२६ च्या पटांगणात असलेले बांधकाम काढून विद्यार्थ्याासाठी मोकळे मैदान उपलब्ध करुन द्यावते तसेच पटागणांलगत असलेल्या इमारतीतील 3 मजले प्राच्य विद्या अभ्यास संस्थेला दिले असून या इमारतीतील दोन मजले उर्दु शाळेसाठी द्यावेत जेणेकरुन उर्दु माध्यमाच्या नववी व दहावीचे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत अशी मागणी नगरसेवक विकास रेपाळे यांनी केली. तसेच प्राच्य विद्या अभ्यास संस्थेच्या आवारात देखील मोकळी जागा असून तेथेही वर्ग खोल्या तयार करता येवू शकतील अशीही सूचना नगरसेव‍िका नम्रता भोसले यांनी केली. यावर सदर इमारतीची पाहणी करुन याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना महापौरांनी दिली.

दरम्यान, प्रभाग क्रमांक 19 मधील रायलादेवी तलाव परिसरातील वाढत्या अस्वच्छता आणि सुरक्षेच्या समस्यांही यावेळी बैठकीत मांडण्यात आली. तलाव परिसरात मद्यपान, नशेखोरी, कचरा साचणे आणि सुरक्षेअभावी गैरप्रकार वाढत असल्याचे निदर्शनास येत असून या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी नगरसेवक विकास रेपाळे व नगरसेविका नम्रता भोसले-जाधव यांनी केली. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी तलावाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर सुरक्षारक्षक नेमण्याचे निर्देश सुरक्षारक्षकांना दिले.

हाजुरी विभागातील शाळा क्रमांक ३९ येथे “डि मार्ट संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळे” संदर्भातही चर्चा झाली. वाढत्या विद्यार्थ्यांच्या संख्येचा विचार करून अतिरिक्त वर्गांची गरज आणि इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची वाढती मागणी लक्षात घेऊन या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.

याशिवाय, पावसाळ्यापूर्वी आवश्यक कामे पूर्ण करण्याच्या सूचना महापौरांनी संबंधित विभागाला दिल्या.. प्रभाग क्रमांक 19 मधील तीन हात नाका परिसरातील उड्डाणपुलाखालील सुशोभीकरणाच्या कामांमध्ये होत असलेल्या दुर्लक्षावरही नाराजी व्यक्त करण्यात आली. या ठिकाणी नियमित स्वच्छता, सुशोभीकरणाची अंमलबजावणी आणि संबंधित कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली.

शहरातील सर्व तलावातील गाळ काढण्याबाबत प्रस्ताव तयार करावा

रायलादेवी तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ असून हा गाळ काढण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला, यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर व सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील सर्व तलावांतील गाळ काढण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत, याबाबत महापौरांनी शहरातील सर्व तलावांमधील गाळ काढण्याबाबत एकत्रित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना या बैठकीत दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande