केअर स्त्री व बाल रुग्णालय चा शुभारंभ बबनराव लोणीकर यांच्या हस्ते संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 06 मे (हिं.स.)। आनंदवाडी येथील बाबुराव काटे यांच्या परिवारातील वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या “काटे हॉस्पिटल मॅटर्निटी केअर स्त्री व बाल रुग्णालय” चा शुभारंभ माजी मंत्री आमदार बबनराव
अ


छत्रपती संभाजीनगर, 06 मे (हिं.स.)। आनंदवाडी येथील बाबुराव काटे यांच्या परिवारातील वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या “काटे हॉस्पिटल मॅटर्निटी केअर स्त्री व बाल रुग्णालय” चा शुभारंभ माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.

बाबुराव काटे यांच्या कुटुंबात एकूण आठ डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून समाजसेवेची परंपरा त्यांनी जपली आहे. डॉ. दिपक विष्णु काटे (बालरोग तज्ञ) व डॉ. रुपाली ताई दिपक काटे-घोरपडे (स्त्रीरोग तज्ञ) यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या या रुग्णालयामुळे परिसरातील माता व बालकांना आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.

या प्रसंगी रमेशराव भापकर, शत्रुघ्न कणसे, संपतराव टकले, ओमप्रकाश मोरे, राम सावंत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी काटे परिवाराच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande