प. बंगालमध्ये शुक्रवारी होणार नवीन मुख्यमंत्र्यांची निवड
कोलकाता , 06 मे (हिं.स.)। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर, नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी कोलकात्यात येणार आहेत. राज्य भाजपाच्या सूत्रांनुसार, त्यांच्या उपस्थितीत बहुधा
बंगालमधील नवीन सरकारचा शपथविधी सोहळा ९ मे रोजी होणार


कोलकाता , 06 मे (हिं.स.)। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर, नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी कोलकात्यात येणार आहेत. राज्य भाजपाच्या सूत्रांनुसार, त्यांच्या उपस्थितीत बहुधा दुसऱ्याच दिवशी म्हणजे ९ मे रोजी आमदार दलाची बैठक होईल आणि त्यामध्ये नेत्याची निवड केली जाईल.

पश्चिम बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष शमिक भट्टाचार्य यांनी सांगितले की, ९ मे (शनिवार) रोजी रवींद्र जयंतीच्या दिवशी शपथविधी सोहळा पार पडेल. सकाळी १० वाजता कोलकात्यातील ऐतिहासिक ब्रिगेड परेड मैदान येथे हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. दरम्यान, भाजपाच्या संसदीय मंडळाने मंगळवारी पश्चिम बंगालमध्ये आमदार दलाचा नेता निवडण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती.याचदरम्यान, नव्याने निवडून आलेल्या भाजप आमदारांची बैठक बुधवारी दुपारी ३ वाजता कोलकात्यातील सॉल्टलेक येथील प्रदेश कार्यालयात बोलावण्यात आली आहे. या बैठकीत प्रदेशाध्यक्षांसह पक्षाचे निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय निरीक्षक उपस्थित राहणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande