
धाराशिव, 06 मे (हिं.स.)।
जिल्ह्यातील क्रीडापटूंना स्पर्धापूर्व सक्षम प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,धाराशिव यांच्या वतीने आर्चरी,जिम्नॅस्टीक्स व कबड्डी या खेळांच्या स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिरांना सुरुवात करण्यात आली आहे.
जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरांत विविध क्रीडा प्रकारांसाठी अनुभवी मार्गदर्शकांची नियुक्ती करण्यात आली आहे.आर्चरी या खेळासाठी श्रीमती शुभांगी रोकडे या मार्गदर्शक असून हे प्रशिक्षण जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था येथे पार पडणार आहे.त्यांच्याशी संपर्कासाठी ९९२२०६२८२८ हा भ्रमणध्वनी क्रमांक देण्यात आला आहे.
जिम्नॅस्टीक्ससाठी श्रीमती डिंपल ठाकरे या मार्गदर्शक म्हणून कार्यरत असून,हे प्रशिक्षण श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम,धाराशिव येथे आयोजित करण्यात आले आहे. संपर्कासाठी ८७६६४२६८८४ हा क्रमांक उपलब्ध आहे.
कबड्डी या खेळासाठी विश्वास खंदारे हे मार्गदर्शक असून,गांधी विद्यालय, चिखली येथे हे प्रशिक्षण होणार आहे.संपर्कासाठी ८८३०५६०४०६ हा भ्रमणध्वनी क्रमांक देण्यात आला आहे.ही प्रशिक्षण शिबिरे दिनांक ५ मे २०२६ ते २५ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली असून,दररोज सकाळी ६ ते ८ आणि सायंकाळी ५ ते ७ या वेळेत सराव सत्रे घेण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis