नांदेड विभागाअंतर्गत १६ मे रोजी ६ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक; काही रेल्वे गाड्या रद्द
छत्रपती संभाजीनगर, 06 मे (हिं.स.)। दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाअंतर्गत नांदेड-लिंबगाव-चुडावा मार्गावर इंटरमिजिएट ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे शनिवारी (ता. १६) सकाळी ७ते ११ आणि सकाळी ११ ते दुपारी १ अशा दोन टप्
नांदेड विभागाअंतर्गत १६ मे रोजी ६ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक; काही रेल्वे गाड्या रद्द


छत्रपती संभाजीनगर, 06 मे (हिं.स.)। दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाअंतर्गत नांदेड-लिंबगाव-चुडावा मार्गावर इंटरमिजिएट ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे शनिवारी (ता. १६) सकाळी ७ते ११ आणि सकाळी ११ ते दुपारी १ अशा दोन टप्प्यांत सहा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेणार आहे. परिणामी, काही एक ट्रेन रद्द तर काही अंशतः रद्द करण्यात आल्या. काही उशिरा धावणार आहेत.

रद्द झालेल्या रेल्वेमध्ये ७७६१६ आदिलाबाद-पूर्णा पॅसेंजरचा (१६ मे) समावेश आहे. अंशतः रद्दमध्ये आदिलाबाद-परळी (५७६५४) मुदखेड ते परळी दरम्यान रद्द; आदिलाबाद ते मुदखेड धावेल. परळी-अकोला (५७६५५) रेल्वे परळी ते पूर्णा दरम्यान रद्द; केवळ पूर्णा ते अकोला धावेल.

परळी-आदिलाबाद (७७६१५) ही रेल्वे पूर्णा ते आदिलाबाद दरम्यान रद्द; केवळ परळी ते पूर्णा धावेल. आदिलाबाद-नांदेड (१७४०९) ही रेल्वे माळटेकडी ते नांदेड दरम्यान रद्द. नांदेड-आदिलाबाद (१७४१०) नांदेड ते माळटेकडी दरम्यान रद्द. निजामाबाद-नांदेड (७७६४५) मुदखेड ते नांदेड दरम्यान रद्द.

सचखंड सुपरफास्ट (१२७१५), तपोवन एक्स्प्रेस (१७६१८) आणि काचीगुडा-नगरसोल (१७६६१) या ट्रेन ६० ते ८० मिनिटे शनिवारी (ता. १६) उशिरा धावतील. या शिवाय शुक्रवारी (ता. १५) धावणारी पनवेल-नांदेड (१७६१३), देवगिरी एक्स्प्रेस (१७०५७) आणि हडपसर-नांदेड (१७६२९) या रेल्वेला ६० ते ८० मिनिटांचा विलंब होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande