परभणी - चारठाण्यात पत्नीची निर्घृण हत्या; पती स्वतःहून पोलिसांत हजर
परभणी, 06 मे (हिं.स.)। चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे बुधवारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पती याने पत्नी
अ


परभणी, 06 मे (हिं.स.)।

चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे बुधवारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पती याने पत्नीला दुचाकीवरून गावालगत असलेल्या जिंतूर–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील शेतातील निवार्यावर नेले. तेथे त्याने प्रथम फावड्याच्या दांड्याने मारहाण केली आणि नंतर डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. या हल्ल्यात यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी स्वतः चारठाणा पोलीस ठाण्यात हजर झाला व गुन्ह्याची कबुली दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे, बीट जमादार उद्धव माने, उद्धव सातपुते तसेच गुप्तचर विभागाचे उमेश बारहाते यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

मृतदेह शवविच्छेदनासाठी जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बप्पासाहेब झिंर्जुडे हे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande