युवा गायिका युगंधरा केचे हिने केला राग मारवा सादर
छत्रपती संभाजीनगर, 06 मे, (हिं.स.)। मासिक संगीत सभेत गायिका युगंधरा केचे, गजानन केचे, शोण पाटील, स्वरीत केचे, स्वरा प्रभुगावकर व सिद्धी सुराशे यांनी सहभाग घेतला. स्वर झंकार या संस्थेने सुरू केलेल्या मासिक संगीत सभेत सिडको परिसरात युवा गायिका युगं
युवा गायिका युगंधरा केचे हिने केला राग मारवा सादर


छत्रपती संभाजीनगर, 06 मे, (हिं.स.)। मासिक संगीत सभेत गायिका युगंधरा केचे, गजानन केचे, शोण पाटील, स्वरीत केचे, स्वरा प्रभुगावकर व सिद्धी सुराशे यांनी सहभाग घेतला.

स्वर झंकार या संस्थेने सुरू केलेल्या मासिक संगीत सभेत सिडको परिसरात युवा गायिका युगंधरा केचे हिने राग मारवा सादर केला. ताल झुमरा विलंबित ख्याल, द्रुत एकताल, त्यानंतर मिश्र पिलू या रागात ठुमरी सादर करून तिने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

संवादिनीवर साथ गजानन केचे यांनी, तबल्यावर शोण पाटील, बासरीवर स्वरीत केचे, तर तानपुऱ्यावर स्वरा प्रभुगावकर व सिद्धी सुराशे यांनी

साथसंगत केली. द्वितीय सत्रात पुण्याचे गायक अतुल खांडेकर यांनी राग बागेश्रीने सुरवात केली. प्रभावी आलापी, आक्रमक ताना आणि वजनदार गायकीने त्यांनी कार्यक्रमाला उंचीवर नेले. त्यानंतर बागेश्री रागातील तराना, राग हंसध्वनीमध्ये तराना व बंदिश सादर केली. त्यानंतर 'स्वयंवर' या नाटकातील नाट्यगीत सादर करून भैरवीने सांगता केली. पूजा भाले, विश्वनाथ ओक, सचिन नेवपूरकर, गिरीश गोसावी, दिलीप दोडके उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande