धाराशिवमधील नळदुर्ग आणि परांडा किल्ल्यांच्या जतन-संवर्धनासाठी कोट्यवधींची योजना
धाराशिव, 06 मे (हिं.स.)। जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग हे एक ऐतिहासिक स्थान असून,येथे असलेला नळदुर्ग किल्ला हा प्रमुख आकर्षण आहे.हा किल्ला प्राचीन काळातील महत्त्वाचा किल्ला मानला जातो.किल्ल्याची मूळ उभारणी कल्याणीच्या चालुक्य काळात झाल्
अ


धाराशिव, 06 मे (हिं.स.)।

जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग हे एक ऐतिहासिक स्थान असून,येथे असलेला नळदुर्ग किल्ला हा प्रमुख आकर्षण आहे.हा किल्ला प्राचीन काळातील महत्त्वाचा किल्ला मानला जातो.किल्ल्याची मूळ उभारणी कल्याणीच्या चालुक्य काळात झाल्याची नोंद आहे.त्या काळात चालुक्यांची राजधानी असलेल्या कल्याणी शहराच्याजवळ असल्यामुळे या किल्ल्याला विशेष महत्त्व होते.सुरुवातीला हा किल्ला मातीचा गढीवजा होता.यानंतर बहामनी सत्तेच्या काळात या किल्ल्याचे रूपांतर भक्कम दगडी बांधकामात करण्यात आले.इ.स. १३५१ ते १४८० या कालावधीत बहामनी सुलतानांनी या किल्ल्याचा विस्तार केला.पुढे आदिलशाही काळात किल्ल्याचे नाव ‘शहादुर्ग’ असे ठेवण्यात आले.इब्राहिम आदिलशहा दुसरा यांच्या कारकीर्दीत इ.स.१६१३ मध्ये बोरी नदीवर बंधारा बांधून ‘पाणी महल’ची निर्मिती करण्यात आली.हा पाणी महल त्या काळातील स्थापत्यशास्त्र व अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना आहे.

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हा किल्ला हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारीत गेला आणि स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्याच ताब्यात राहिला. निजाम शासनाच्या १२ जानेवारी १९५३ च्या अधिसूचनेनुसार किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारक घोषित केले.राज्य पुनर्रचनेनंतर हा किल्ला महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या ताब्यात आला असून त्याची देखभाल व दुरुस्तीचे काम पुरातत्व विभागामार्फत केले जाते.

विभागीय निधी अंतर्गत व्यापक विकास आराखडा :

नळदुर्ग किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.त्यानुसार,या स्मारकाचा ‘महावारसा विशेष स्मारक योजना’ अंतर्गत समावेश करण्यात आला आहे.या कामासाठी वास्तुविशारदांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी रुपये १० कोटी ८७ लक्ष ५५ हजार ६९८ रुपये इतक्या रकमेचा सविस्तर विकास आराखडा तयार केला आहे.हा प्रस्ताव दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी प्रशासकीय व वित्तीय मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.

या आराखड्यातील प्रमुख कामे पुढीलप्रमाणे आहेत :

स्मारक परिसरातील झाडेझुडपे काढणे,शास्त्रोक्त पद्धतीने उत्खनन, तटबंदीचे मजबुतीकरण,दगडी पायऱ्या व गार्ड रेलिंग,रणमंडल भागातील तटबंदीची दुरुस्ती,भेगा पडलेल्या भिंतींना ग्राऊटिंग,पाणी महल व उपळी बुरुज परिसरातील दुरुस्ती,दगडी पाथवे निर्माण, पर्यटकांसाठी दिशादर्शक फलक, स्मारकाचे दस्तऐवजीकरण,इतर पूरक कामे आदी कामांचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande