परभणी - दारूच्या नशेत झालेल्या वादातून मित्राचा खून
परभणी, 10 जून (हिं.स.)। सोबत दारू प्यायला गेलेल्या मित्रांमध्ये दारूच्या नशेत झालेल्या वादातून मित्राचा खून केल्याची घटना तालुक्यातील धर्मापुरी शिवारात उघडकीस आली. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. अशोक भगवान मोरे(वय
दारूच्या नशेत उफाळला वाद; मित्राने घेतला मित्राचा प्राण  -परभणी तालुक्यातील धर्मापुरी शिवारातील घटना


परभणी, 10 जून (हिं.स.)। सोबत दारू प्यायला गेलेल्या मित्रांमध्ये दारूच्या नशेत झालेल्या वादातून मित्राचा खून केल्याची घटना तालुक्यातील धर्मापुरी शिवारात उघडकीस आली. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे.

अशोक भगवान मोरे(वय ३५) रा. धर्मापुरी ता. परभणी असे मयत युवकाचे नाव आहे. मयत अशोक मोरे आणि त्याचे मित्र मंगळवारी रात्री उशिरा टाकळी कुंभकर्ण शिवारातील पोदार शाळा परिसरात दारू पिण्यासाठी गेले होते. यादरम्यान त्यांच्यात वाद उफाळून आला. या वादातून अशोक मोरेच्या मित्रांनी त्यास लिंबाच्या काठीने आणी दगडाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत अशोक मोरे यांचा मृत्यू झाला.

अशोकचा मृत्यू झाल्याने घाबरलेल्या मित्रांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र पुन्हा गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने मयत अशोकचा मृतदेह टाकळी कुंभकर्ण शिवारातील गौरक्षण परिसरात आणून टाकला. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच परभणी ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरतोडे, परभणी ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू, पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक मोहिते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, घटनेच्या तपासणीकामी फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे धर्मापुरी परिसरात एकच खळबळ उडाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande