
जम्मू, 10 जून (हिं.स.)। जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषा ओलांडून (एलओसी) भारतीय हद्दीत घुसलेल्या एका १४ वर्षीय पाकिस्तानी मुलाला लष्कराने मंगळवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले असून, प्रस्थापित कार्यपद्धतीनुसार कारवाई केली जात आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, मेंढर सेक्टरच्या नगरी टेकडी परिसरात सीमा ओलांडल्यानंतर काही वेळातच, आघाडीच्या भागात तैनात असलेल्या सतर्क जवानांनी त्या मुलाला अडवले. प्राथमिक तपासानुसार, तो पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून नकळतपणे नियंत्रण रेषा ओलांडून आला असावा. त्याच्या सीमा ओलांडण्याच्या परिस्थितीची खात्री करण्यासाठी आणि सुरक्षेसंबंधी कोणतीही चिंता दूर करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा पुढील तपास करत आहेत. तपास पूर्ण झाल्यावर मुलाला मायदेशी परत पाठवले जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule