केंद्रीय मंत्रिमंडळाकडून पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ विशेष ठराव मंजूर
नवी दिल्ली, १० जून (हिं.स.) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताचे पंतप्रधान म्हणून आज, १० जून रोजी ४,३९९ दिवस पूर्ण केले. यासह, त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, ज्यांनी ४,३९८ दिवस पंतप्रधानपद भूषवले होते, त्यांचा विक्रम मोडला. केंद्रीय मं
केंद्रीय मंत्रिमंडळाकडून पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ विशेष ठराव मंजूर


नवी दिल्ली, १० जून (हिं.स.) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताचे पंतप्रधान म्हणून आज, १० जून रोजी ४,३९९ दिवस पूर्ण केले. यासह, त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, ज्यांनी ४,३९८ दिवस पंतप्रधानपद भूषवले होते, त्यांचा विक्रम मोडला. केंद्रीय मंत्रिमंडळाने हा विक्रम साधल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. गेल्या १२ वर्षांपासून सलग सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान म्हणून सेवा बजावल्याबद्दल पंतप्रधान मोदींची प्रशंसा करणारा ठराव मंत्रिमंडळाने मंजूर केला. मंत्रिमंडळाचे सदस्यही उभे राहिले आणि त्यांनी पंतप्रधान मोदींचा सन्मान केला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून, भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. राष्ट्रपती म्हणाल्या की, ही कामगिरी केवळ सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवण्यापुरती मर्यादित नाही; तर सलग निवडणुकांमध्ये भारताच्या जनतेने तुमच्या नेतृत्वावर ठेवलेल्या विश्वासाची ही पुन्हा एकदा पुष्टी आहे.

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी भारताचे निर्वाचित पंतप्रधान म्हणून सर्वाधिक सलग कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, हा ऐतिहासिक टप्पा केवळ कार्यकाळाचे मोजमाप नाही, तर आपल्या देशाच्या विकास प्रवासातील एका परिवर्तनशील काळाचे प्रतिबिंब आहे. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताने प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती अनुभवली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande