रिलायन्स जामनगरमध्ये मेटासोबत मिळून उभारणार १६८ मेगावॅटचे डेटा सेंटर
नवी दिल्ली, 10 जून (हिं.स.)। रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) ने अमेरिकेतील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी मेटासोबत मिळून जामनगर येथे १६८ मेगावॅट क्षमतेचे डेटा सेंटर विकसित करण्यासाठी भागीदारी केली आहे. हे डेटा सेंटर पुढील दोन वर्षांत पूर्ण होणार असू
Reliance Build 168 MW Data Center Jamnagar Partnership Meta


नवी दिल्ली, 10 जून (हिं.स.)। रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) ने अमेरिकेतील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी मेटासोबत मिळून जामनगर येथे १६८ मेगावॅट क्षमतेचे डेटा सेंटर विकसित करण्यासाठी भागीदारी केली आहे. हे डेटा सेंटर पुढील दोन वर्षांत पूर्ण होणार असून भविष्यात त्याची क्षमता १६८ मेगावॅटपेक्षा अधिक वाढविण्याचा पर्यायही राखून ठेवण्यात आला आहे. मेटाने २०२० मध्ये जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये ५.७ अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक केली होती.

हे भारतातील मेटासाठी पहिले ‘बिल्ट-टू-सूट’ डेटा सेंटर असेल. भारत जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) पायाभूत सुविधा केंद्र म्हणून उदयास येण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या प्रकल्पाच्या विस्ताराचाही पर्याय उपलब्ध राहणार आहे. या सुविधेतील क्षमता मेटा भाडेपट्ट्यावर (लीजवर) घेणार आहे. भारतातील मेटासाठी हे पहिले ‘बिल्ट-टू-सूट’ डेटा सेंटर असून, भारताच्या जागतिक एआय पायाभूत सुविधा केंद्र म्हणून होत असलेल्या प्रगतीचे ते महत्त्वपूर्ण प्रतीक ठरणार आहे.

आरआयएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी सांगितले की, मेटासोबतची ही भागीदारी भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी परिवर्तन घडवून आणणारा महत्त्वाचा टप्पा आहे. ते म्हणाले की, मेटासारख्या जागतिक तंत्रज्ञान कंपनीसाठी भारतातील पहिले ‘बिल्ट-टू-सूट’ डेटा सेंटर उभारणे हे भारत जागतिक एआय क्रांतीत नेतृत्वाची भूमिका बजावण्यासाठी सज्ज असल्याचे द्योतक आहे.

मुकेश अंबानी म्हणाले की, जामनगर हे हायपरस्केल एआय संगणनाचे (कम्प्युटिंगचे) एक प्रमुख केंद्र म्हणून विकसित होईल आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी मेटासोबत भागीदारी करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande