एसटी बस चालकाला मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल
लातूर, 10 जून (हिं.स.) : लातूरहून अहमदपूरकडे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बस चालकाला अडवून मारहाण केल्याची धक्कादायक घटना अहमदपूर येथे घडली. या प्रकरणी मोहसीन इमोद्दीन मणियार आणि त्याच्या तीन अनोळखी साथीदारांविरुद्ध अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा द
गुन्हा  दाखल


लातूर, 10 जून (हिं.स.) : लातूरहून अहमदपूरकडे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बस चालकाला अडवून मारहाण केल्याची धक्कादायक घटना अहमदपूर येथे घडली. या प्रकरणी मोहसीन इमोद्दीन मणियार आणि त्याच्या तीन अनोळखी साथीदारांविरुद्ध अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बजरंग लक्ष्मण जायभाये (वय 45, रा. येस्तार) हे अहमदपूर आगारात चालक म्हणून कार्यरत आहेत. ते सरकारी बस (क्र. MH 20 BL 3101) घेऊन वाहक कल्पना बनसोडे यांच्यासह लातूरहून अहमदपूरकडे येत होते.

दरम्यान, अहमदपूर येथील भागीरथी लॉजसमोरील रस्त्यावर समोरून येणारा एक दुचाकीस्वार रस्त्याच्या मध्यभागी वाहन चालवत होता. बस चालकाने वारंवार हॉर्न वाजवूनही दुचाकीस्वाराने वाहन बाजूला घेतले नाही. त्यामुळे चालकाने बस बाजूने पुढे नेली.

याचा राग आल्याने आरोपी मोहसीन मणियार याने आपली दुचाकी बससमोर आडवी लावून बस थांबवली. त्यानंतर त्याने आपल्या तीन साथीदारांना बोलावून बस चालक बजरंग जायभाये यांना मारहाण केली. या प्रकारामुळे सरकारी कामकाजात अडथळा निर्माण झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच अहमदपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी मोहसीन इमोद्दीन मणियार (रा. अरफत कॉलनी, अहमदपूर) व त्याच्या तीन अनोळखी साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 132, 115(2), 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव करीत आहेत.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande