ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का, तृणमूल खासदार सुष्मिता देव यांचा राजीनामा
नवी दिल्ली, 10 जून (हिं.स.)तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत संकट अधिकच गडद होत असल्याचे दिसत आहे. पक्षाच्या राज्यसभा खासदार सुष्मिता देव यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन ममता बॅनर्जी गटाला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षात बंडा
सुष्मिता देव यांनी घेतली आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांची भेट


नवी दिल्ली, 10 जून (हिं.स.)तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत संकट अधिकच गडद होत असल्याचे दिसत आहे. पक्षाच्या राज्यसभा खासदार सुष्मिता देव यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन ममता बॅनर्जी गटाला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षात बंडाळीच्या बातम्या येत होत्या आणि सुष्मिता देव यांच्या राजीनाम्यामुळे हे संकट अधिकच गंभीर झाले आहे. यापूर्वी, तृणमूलचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील दीर्घकाळचे मुख्य प्रतोद सुखेंदू शेखर रॉय यांनीही पक्ष सोडला होता. राजीनाम्यांची ही मालिका स्पष्टपणे दर्शवते की तृणमूल काँग्रेसमधील असंतोष झपाट्याने वाढत आहे.

ममता बॅनर्जी यांनी काल सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. पक्षात फूट पडू नये यासाठी ममता सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. पण एक-एक करून त्यांचे सहकारी त्यांना सोडून जात आहेत. काही दिवसांपूर्वीच, लोकसभा खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यांनी दावा केला की, तृणमूल काँग्रेसच्या २८ खासदारांपैकी २० खासदारांचा त्यांना पाठिंबा आहे. पक्षांतरबंदी कायदा टाळण्यासाठी विरोधी गटाला १९ खासदारांची आवश्यकता असते.

सुष्मिता देव एकेकाळी माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्ती होत्या. मात्र, आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्ण यांना लिहिलेल्या पत्रात सुष्मिता देव यांनी म्हटले आहे, मी याद्वारे राज्यसभा सदस्यपदाचा राजीनामा देत आहे. आपण तो तात्काळ स्वीकारावा अशी माझी विनंती आहे.

सुष्मिता देव यांनी २०२१ मध्ये काँग्रेस पक्ष सोडून टीएमसीमध्ये प्रवेश केला. त्या काँग्रेस पक्षातील अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या प्रमुख होत्या आणि त्यांनी आसाममधील सिलचर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून काम केले आहे. सुष्मिता देव आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना भेटत असल्याचा एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोमुळे सुष्मिता देव भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande