इराणने युद्ध समाप्तीसाठी करार करावा, अन्यथा त्यांचा विनाश होईल - ट्रम्प
बीजिंग, 10 जून (हिं.स.) - इराणचे लष्कर पूर्णपणे कोलमडले असून त्यांचे नौदल आणि वायुदल जवळपास नष्ट झाले आहे. इराण समाप्त झाला असून आता इराणने सध्या सुरू असलेले युद्ध समाप्त करण्यासाठी करार करायला हवा, अन्यथा इराणचा विनाश होईल, असा दावा अमेरिकेचे राष्
ट्रम्प


बीजिंग, 10 जून (हिं.स.) - इराणचे लष्कर पूर्णपणे कोलमडले असून त्यांचे नौदल आणि वायुदल जवळपास नष्ट झाले आहे. इराण समाप्त झाला असून आता इराणने सध्या सुरू असलेले युद्ध समाप्त करण्यासाठी करार करायला हवा, अन्यथा इराणचा विनाश होईल, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिका इराणला अण्वस्त्रे मिळू देणार नाही, या आपल्या निर्धाराचा ट्रम्प यांनी पुनरुच्चारही केला. ट्रम्प यांनी टिप्पणी केली की, इराण केवळ बढाया मारतो पण कोणतीही कृती करत नाही; एकेकाळी मध्य पूर्वेतील वर्चस्व गाजवणारी आणि दादागिरी करणारी ही शक्ती आता संपली आहे. करारासाठी वाटाघाटी करण्यात इराणने खूप उशीर केला आणि आता त्यांना याची किंमत मोजावी लागेल.

ट्रम्प पुढे म्हणाले की, इराणमधील अमेरिकेची कारवाई व्हिएतनाम आणि इराकमध्ये केलेल्या कारवाईपेक्षा खूपच छोटी होती. इराणचे नौदल आता नष्ट झाले असून त्यांच्याकडे विमानरोधी क्षमताही उरलेली नाही. त्यांनी जेवढी क्षमता वाढवली आहे, ती आम्ही एक दिवसात संपवू शकतो. इराणने करार करावा, अशी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचीही इच्छा असावी. यासाठी जिनपिंग यांनी सहाय्य करण्याची तयारीही दाखवली आहे. जर मला काही मदत करणे शक्य असेल, तर मला मदत करायला आवडेल, असे जिनपिंग यांनी म्हटल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. इराणकडे अण्वस्त्रे असावीत, असे चीनलाही वाटत नसावे, असेही ते म्हणाले.

अमेरिका इराणमधील खार्ग बेट अवघ्या ४ ते ५ मिनिटातच नष्ट करू शकत असल्याचा विश्‍वास चीनच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफ जनरल दान केन यांनी म्हटल्याचा हवालाही ट्रम्प यांनी दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande