ओजस मॅक्सिव्हिजन आय हॉस्पिटलचा मुंबईत आणखी विस्तार; जुहूमध्ये नव्या केंद्राचे उद्घाटन
मुंबई, 10 जून (हिं.स.) ओजस मॅक्सिव्हिजन सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल्सने जुहू येथे नव्या केंद्राच्या उद्घाटनासह मुंबईतील आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. यासोबतच, शहरातील अत्याधुनिक दृष्टीदोष सुधारणा आणि मोतीबिंदू उपचार तंत्रज्ञानांचा सर्वसमावेशक संच
Ojas Maxivision Eye Hospital


मुंबई, 10 जून (हिं.स.) ओजस मॅक्सिव्हिजन सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल्सने जुहू येथे नव्या केंद्राच्या उद्घाटनासह मुंबईतील आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. यासोबतच, शहरातील अत्याधुनिक दृष्टीदोष सुधारणा आणि मोतीबिंदू उपचार तंत्रज्ञानांचा सर्वसमावेशक संच उपलब्ध करून देणाऱ्या अग्रगण्य नेत्रसेवा नेटवर्कपैकी एक म्हणूनही हॉस्पिटलने आपले स्थान निर्माण केले आहे. या विस्ताराचा भाग म्हणून, हॉस्पिटलने ELITA SILK आणि WaveLight® Plus InnovEyes या तंत्रज्ञानांचे एकत्रीकरण मुंबईत प्रथमच एका ब्रँडअंतर्गत (बांद्रा केंद्रात) उपलब्ध करून दिले आहे. यामुळे रिफ्रॅक्टिव्ह एक्सलन्स सेंटर म्हणून त्यांचे स्थान अधिक मजबूत झाले आहे.

पश्चिम भारत हा मॅक्सिव्हिजनसाठी सातत्याने महत्त्वाचे विकास क्षेत्र राहिले असून कंपनीच्या एकूण महसुलात या भागाचे सुमारे 30-35% योगदान आहे. तर पश्चिम विभागातील व्यवसायात मुंबईचा वाटा जवळपास 30-35% आहे. पुढील पाच वर्षांत पश्चिम विभागात 20-25% CAGR वाढ साध्य करण्याचे नेटवर्कचे उद्दिष्ट आहे.

ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. जिगीश गांधी आणि डॉ. सुमन नाबर यांच्या वैद्यकीय नेतृत्वाखाली नव्याने सुरू करण्यात आलेले जुहू केंद्र मोतीबिंदू, LASIK, रिफ्रॅक्टिव्ह शस्त्रक्रिया, कॉर्निया, ग्लॉकोमा, रेटिना, लहान मुलांसाठीच्या नेत्रचिकित्सा आणि सर्वसाधारण नेत्रचिकित्सा या क्षेत्रांतील सर्वसमावेशक नेत्रसेवांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी स्थापन करण्यात आले आहे.

बांद्रा येथील रिफ्रॅक्टिव्ह एक्सलन्स केंद्रामध्ये ओजस मॅक्सिव्हिजनने मुंबईत प्रथमच ELITA SILK आणि WaveLight® Plus InnovEyes ही दोन्ही तंत्रज्ञाने एकाच छताखाली उपलब्ध करून दिली आहेत. या तंत्रज्ञानांमुळे नेत्रशल्यविशारदांना जगातील सर्वात प्रगत अशा दोन रिफ्रॅक्टिव्ह शस्त्रक्रिया प्लॅटफॉर्मचा वापर करता येतो. त्यामुळे प्रत्येक रुग्णाच्या कॉर्निअल वैशिष्ट्यांनुसार, दृष्टीविषयक गरजांनुसार आणि जीवनशैलीशी सुसंगत अशा उपचारपद्धतीची निवड करणे शक्य होते.

WaveLight® Plus InnovEyes मधून अत्याधुनिक वैयक्तिकृत लेझर दृष्टीसुधारणा उपचार होतात. हा प्लॅटफॉर्म अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून रुग्णाच्या डोळ्याची अत्यंत तपशीलवार 3D डिजिटल प्रतिकृती तयार करते आणि शस्त्रक्रियेपूर्वी उपचारांचे संभाव्य परिणाम आभासी स्वरूपात सादर करून दाखवते.

ELITA SILK हे लेझरद्वारे दृष्टीसुधारणेसाठी फ्लॅपविरहित आणि ब्लेडविरहित पद्धत सादर करते. ही पद्धत ऊतींवरील परिणाम कमीत कमी ठेवण्यासाठी विकसित करण्यात आली असून, उत्कृष्ट दृष्टी परिणाम, अधिक सुधारित रुग्णसुविधा आणि जलद दृष्टी परत मिळविण्यासाठी मदत करते.

एकाच रिफ्रॅक्टिव्ह एक्सलन्स सेंटरमध्ये ही दोन्ही तंत्रज्ञाने उपलब्ध करून देत ओजस मॅक्सिव्हिजन नेत्रशल्यविशारदांना प्रत्येक रुग्णासाठी सर्वाधिक योग्य तंत्रज्ञानाची शिफारस करण्याची संधी देते. त्यायोगे वैयक्तिक गरजांनुसार नेत्रसेवा पुरविण्याच्या रुग्णालयाच्या बांधिलकीला अधिक बळ मिळते.

मॅक्सिव्हिजन सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. जी. एस. के. वेलू म्हणाले, “पश्चिम भारतात आमच्यासाठी मुंबई ही सर्वात महत्त्वाच्या विकास बाजारपेठांपैकी एक आहे. याचे कारण केवळ तिचा व्यापक आकार नसून उच्च प्रमाणातील अचूकता आणि तंत्रज्ञानाधारित नेत्रसेवांची वाढती मागणी हे देखील आहे. मॅक्सिव्हिजनमध्ये विकास म्हणजे केवळ आमच्या स्थानाचा विस्तार नव्हे, तर अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञ आणि प्रमाणबद्ध रुग्ण सेवा परिणाम यांच्या आधारावर वैद्यकीय उत्कृष्टतेची केंद्रे उभारणे आहे. बाजारपेठेतील आमची पकड अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही नजिकच्या भविष्यात मुंबईत आणखी तीन केंद्रे सुरू करण्याचीही योजना आखत आहोत.”

ओजस मॅक्सिव्हिजन आय हॉस्पिटल्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नितीन देढिया म्हणाले, “नेत्रसेवा अधिक अचूक, वैयक्तिकृत आणि अंदाजयोग्य परिणामांच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि WaveLight® Plus InnovEyes व ELITA SILK यांचे एकत्रीकरण या परिवर्तनाचे प्रतिबिंब आहे. या तंत्रज्ञानांमुळे आम्हाला अधिक सानुकूलित रिफ्रॅक्टिव्ह उपचार तसेच डिजिटल मार्गदर्शित रिफ्रॅक्टिव्ह शस्त्रक्रिया नियोजनाची सुविधा उपलब्ध होते. त्यातून उपचारांची अचूकता तसेच रुग्णांच्या उपचारांचे परिणाम अधिक सुधारतात. नव्याने विस्तारित नेटवर्कद्वारे दरवर्षी 1 लाखांहून अधिक रुग्णांना सेवा देणे आणि सुमारे 20,000 शस्त्रक्रियांना सहाय्य करणे अपेक्षित आहे. त्यामुळे हे नवीन केंद्र म्हणजे मुंबईतील नागरिकांसाठी अत्याधुनिक नेत्रसेवा अधिक सुलभ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”

या विस्तारामुळे ओजस आय हॉस्पिटल आणि मॅक्सिव्हिजन सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल्स यांच्यातील सहकार्य आणखी मजबूत झाले आहे. दरवर्षी 3 लाखांहून अधिक रुग्णांना सेवा देत सध्याच्या 3 केंद्रांपासून कार्यरत असलेल्या ओजस मॅक्सिव्हिजनचे आर्थिक वर्ष 2031 पर्यंत आपले नेटवर्क 30 केंद्रांपर्यंत विस्तारण्याचे ध्येय आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande