पीओकेमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; २० सैनिकांचा मृत्यू
काश्मीर, 10 जून (हिं.स.)। पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद परिसरात पाकिस्तानच्या लष्कराचे एमआय-१७ प्रकारचे हेलिकॉप्टर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात हेलिकॉप्टरमधील वैमानिकासह सर्व २० सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उ
pakistan armys mi 17 helicopter crashes pok muzaffarabad 20 dead


pakistan armys mi 17 helicopter crashes pok muzaffarabad 20 dead


काश्मीर, 10 जून (हिं.स.)। पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद परिसरात पाकिस्तानच्या लष्कराचे एमआय-१७ प्रकारचे हेलिकॉप्टर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात हेलिकॉप्टरमधील वैमानिकासह सर्व २० सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उड्डाण घेत असतानाच हेलिकॉप्टर अचानक कोसळल्याने हा भीषण अपघात झाला. दुर्घटनेनंतर बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून मदत व शोधकार्य युद्धपातळीवर राबविण्यात आले.

पाकिस्तानमधील वृत्तांनुसार, पाकिस्तानी लष्कराच्या हवाई विभागाचे हे हेलिकॉप्टर मुझफ्फराबादजवळील भागातून उड्डाण करत होते. मात्र उड्डाणाच्या वेळीच त्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाला आणि काही क्षणांत हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळले. अपघात इतका भीषण होता की हेलिकॉप्टरमधील कोणालाही जीव वाचवता आला नाही. लष्कराने जारी केलेल्या प्राथमिक निवेदनात तांत्रिक बिघाड हे अपघाताचे संभाव्य कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

ही दुर्घटना पाकव्याप्त काश्मीरमधील नीलम खोऱ्यात घडल्याचे सांगितले जात आहे. या भागात अलीकडच्या काळात सुरू असलेल्या विविध हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पाकिस्तानने लष्करी हेलिकॉप्टरांची तैनाती केली होती. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये वैमानिकासह २० सैनिक प्रवास करत होते. अपघातानंतर सर्व मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले असून मृत जवानांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. मात्र त्यांच्या नावांची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, लष्करी अधिकारी आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचली. संपूर्ण परिसराला सुरक्षा घेरा घालण्यात आला असून ढिगारा हटविण्याचे काम वेगाने सुरू आहे. अपघातामुळे पाकिस्तानच्या लष्करी यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी बलुचिस्तानमध्येही पाकिस्तानी लष्कराचे एक हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली होती.

या भीषण दुर्घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पाकिस्तान लष्कराने उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. प्राथमिक तपासात तांत्रिक बिघाडाचा संशय व्यक्त करण्यात आला असला तरी घातपात, यांत्रिक दोष किंवा इतर कोणतीही शक्यता नाकारण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व बाजूंनी सखोल तपास केला जाणार असून या अपघाताचा सविस्तर अहवाल लवकरच समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande