सेरेना विल्यम्सचे चार वर्षांनंतर टेनिस कोर्टवर विजयासह पुनरागमन
लंडन, १० जून (हिं.स.) । अमेरिकन टेनिसपटू सेरेना विल्यम्सने जवळपास चार वर्षांनंतर व्यावसायिक टेनिसमध्ये पुनरागमन करत, मंगळवारी क्वीन्स क्लबच्या कोर्टवरील स्पर्धेत एक संस्मरणीय दुहेरी विजय मिळवला. या टेनिसपटूने १९ वर्षीय कॅनेडियन व्हिक्टोरिया म्बोको
सेरेना विल्यम्स


लंडन, १० जून (हिं.स.) । अमेरिकन टेनिसपटू सेरेना विल्यम्सने जवळपास चार वर्षांनंतर व्यावसायिक टेनिसमध्ये पुनरागमन करत, मंगळवारी क्वीन्स क्लबच्या कोर्टवरील स्पर्धेत एक संस्मरणीय दुहेरी विजय मिळवला. या टेनिसपटूने १९ वर्षीय कॅनेडियन व्हिक्टोरिया म्बोकोसोबत आपला पहिला सामना जिंकला.

सेरेना आणि म्बोकोने तिसऱ्या मानांकित जोडी निकोल मेलिचार-मार्टिनेझ आणि एरिन राउटलिफ यांचा ७-६ (२), ६-२ असा पराभव केला. २०२२ च्या अमेरिकन ओपननंतर सेरेनाचा हा पहिला व्यावसायिक सामना होता. सामन्यादरम्यान, सेरेनाने ताशी १२० मैल वेगाने सर्व्हिस केली आणि अनेक शक्तिशाली विनर्स मारले. तिने दोन एस आणि एका शानदार सर्व्हिस विनरच्या जोरावर दिमाखदारपणे सामना संपवला.

सेरेनाचे पुनरागमन खास होते कारण प्रतिस्पर्धी संघ खूपच मजबूत होता. एरिन राउटलिफ दोन वेळा यूएस ओपन दुहेरीची विजेती आहे, तर निकोल मेलिचार-मार्टिनेझ विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. सेरेनाच्या खेळात तिच्या पूर्वीच्या लयीची काहीशी कमतरता जाणवत होती, पण तिने अनेक प्रसंगी हे सिद्ध केले की तिच्यात अजूनही सर्वोच्च स्तरावर स्पर्धा करण्याची क्षमता आहे.

सेरेना पुढील आठवड्यात जर्मनीतील बर्लिन ओपनमध्ये दुहेरीचा सामनाही खेळणार आहे. मात्र, २९ जूनपासून सुरू होणाऱ्या विम्बल्डनमध्ये सहभागी व्हायचे की नाही, हे तिने अद्याप ठरवलेले नाही. सेरेना विल्यम्सने आपल्या कारकिर्दीत २३ ग्रँ स्लॅम एकेरी विजेतेपदे पटकावली आहेत, ज्यात विम्बल्डनच्या सात विजेतेपदांचा समावेश आहे. तसेच, तिने आपली मोठी बहीण व्हीनस विल्यम्ससोबत १४ ग्रँडस्लॅम दुहेरी विजेतेपदेही जिंकली आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande