नेपाळमधून भारतात तस्करी केला जाणारा ९२२ किलो गांजा जप्त
काठमांडू, 11 जून (हिं.स.)। नेपाळच्या सशस्त्र पोलीस दलाने (एपीएफ) आज सकाळी नेपाळमधून भारतात तस्करीसाठी नेला जात असलेला तब्बल ९२२ किलो गांजा जप्त केला. ही कारवाई मोरंग जिल्ह्यातील सीमावर्ती जहदा भागात करण्यात आली. सशस्त्र पोलीस दलाच्या सीमा सुरक्षा
नेपाळ


काठमांडू, 11 जून (हिं.स.)। नेपाळच्या सशस्त्र पोलीस दलाने (एपीएफ) आज सकाळी नेपाळमधून भारतात तस्करीसाठी नेला जात असलेला तब्बल ९२२ किलो गांजा जप्त केला. ही कारवाई मोरंग जिल्ह्यातील सीमावर्ती जहदा भागात करण्यात आली.

सशस्त्र पोलीस दलाच्या सीमा सुरक्षा पथकातील सोमबारी बीओपी, नोचा आणि तरेगामा पोस्टच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणात एक पिकअप वाहन आणि एक मोटारसायकल ताब्यात घेण्यात आली आहे.

जप्त करण्यात आलेला गांजा २९ पॅकेट्समध्ये भरून भाताच्या भुश्याच्या पोत्यांखाली लपवून पिकअप वाहनात ठेवण्यात आला होता. एपीएफच्या माहितीनुसार, पिकअप वाहनाच्या पुढे बीआर ३८ झेड ७४५२ क्रमांकाची मोटारसायकल चालत होती.

सुरक्षा कर्मचाऱ्यांना पाहताच दोन्ही वाहनांचे चालक आपली वाहने घटनास्थळी सोडून फरार झाले. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande