अमेरिकेचा सलग दुसऱ्या दिवशी इराणवर हल्ला, संपूर्ण देश स्फोटांच्या आवाजाने हादरला
तेहरान, 11 जून (हिं.स.) : मध्यपूर्वेतील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. अमेरिकेने सलग दुसऱ्या दिवशी इराणवर हल्ले केले असून, त्यामुळे या प्रदेशातील तणाव आणखी वाढला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या न
अमेरिकेचा सलग दुसऱ्या दिवशी इराणवर हल्ला


तेहरान, 11 जून (हिं.स.) : मध्यपूर्वेतील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. अमेरिकेने सलग दुसऱ्या दिवशी इराणवर हल्ले केले असून, त्यामुळे या प्रदेशातील तणाव आणखी वाढला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार, त्यांनी इराणमधील अनेक ठिकाणांना लक्ष्य करून आत्मसंरक्षणात्मक हल्ले केले. अमेरिकेने म्हटले आहे की, इराणच्या सततच्या आणि अन्यायकारक आक्रमकतेला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. या हल्ल्यांनंतर, होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या आसपास स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. इराणी माध्यमांनुसार, दक्षिणेकडील बंदर अब्बास हे बंदर शहर, केशम बेट, मिनाब आणि सिरिक येथे स्फोटांचे आवाज ऐकू आले.

इराणच्या सर्वोच्च संयुक्त लष्करी कमांडने म्हटले आहे की, त्यांनी होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली असून कोणत्याही जहाजाला त्यातून जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यातून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजाला लक्ष्य केले जाईल. पण, 'एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये, अमेरिकेच्यासेंटकॉमने म्हटले आहे की हे वृत्त खोटे आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली असून, जहाजे अजूनही त्यातून जात आहेत.

दरम्यान, इराणी माध्यमांनी वृत्त दिले आहे की, होर्मुझमधून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जहाजांवर हल्ला झाला. पण, अमेरिकन लष्कराने हे नाकारले आहे. यूएस सेंटकॉमच्या आणखी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, कोणत्याही अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला झाला नाही.

या परिस्थितीत, तीन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेली युद्ध संपवण्यासाठीची वाटाघाटी भरकटल्यासारखी दिसत आहे. या अमेरिकन लष्करी हल्ल्यांपूर्वीच, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले होते की इराणवर जोरदार हल्ला केला जाईल. त्यांनी आरोप केला की, युद्ध संपवण्यासाठी सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये इराणची भूमिका सहकार्याची नाही आणि चर्चेत कोणतीही प्रगती झालेली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande