
परभणी, 13 जून (हिं.स.)। सेलूतालुक्यात अवैधरित्या वाळूची वाहतूक करणार्या ट्रॅक्टरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सकाळी धडक कारवाई करत ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाळूसह एकूण 3 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, दूधना नदीपात्रातून शासनाचा महसूल बुडविण्याच्या उद्देशाने अवैधरीत्या वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार शनिवारी सकाळी सुमारे 9 वाजता शहरातील समर्थ जिनिंग परिसरात सापळा रचून संबंधित वाहन ताब्यात घेण्यात आले. कारवाईदरम्यान गोविंद शेवाळे यांच्या मालकीचा विनानंबर ट्रॅक्टर, ट्रॉली आणि त्यामधील वाळू असा एकूण 3 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, विलास सातपूते, विष्णू चव्हाण, उमेश चव्हाण आणि मधुकर ढवळे यांच्या पथकाने केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis