
तेहरान, 13 जून (हिं.स.)इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या अंत्यविधीला ४ जुलै रोजी तेहरानमध्ये सुरुवात होईल आणि ९ जुलै रोजी ईशान्येकडील मशहद शहरात त्यांच्या दफनविधीने समारोप होईल. फेब्रुवारीमध्ये इराणवर झालेल्या इस्रायली आणि अमेरिकन हल्ल्यांमध्ये खामेनी मारले गेले. त्यांच्या मृत्यूने इस्लामिक प्रजासत्ताकाच्या प्रमुखपदी असलेल्या त्यांच्या तीन दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीचा अंत झाला. पण, इराणवरील अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर खामेनी यांचा अंत्यविधी अद्याप पार पडलेला नाही, पण आता इराणने जुलैमध्ये अंत्यविधीची तारीख जाहीर केली आहे.
अयातुल्ला सय्यद अली खामेनी यांना मशहद येथील इमाम रझा (अ.स.) यांच्या पवित्र दर्ग्यात दफन केले जाईल. विशेषतः पाकिस्तान, अफगाणिस्तान, भारत, बांगलादेश आणि काश्मीर प्रदेशातून मोठ्या संख्येने परदेशी यात्रेकरू येण्याची अपेक्षा आहे.
फेब्रुवारीमध्ये झालेल्या खामेनी यांच्या निधनाने इस्लामिक प्रजासत्ताकाच्या प्रमुखपदी असलेल्या त्यांच्या तीन दशकांहून अधिक काळाच्या कार्यकाळाचा अंत झाला. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी जेव्हा त्यांचे निधन झाले, तेव्हा ते ८६ वर्षांचे होते. त्यांचे पुत्र, अयातुल्ला मोजतबा खामेनी, यांची त्यांचे उत्तराधिकारी म्हणून निवड झाली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे