पाकिस्तान समर्थित गुन्हेगारी मॉड्यूलचा भंडाफोड, 7 जणांना अटक
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची मोठी कारवाई नवी दिल्ली, 16 जून (हिं.स.) : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि ईस्टर्न रेंजच्या संयुक्त पथकाने पाकिस्तान-समर्थित एका मोठ्या आंतरराष्ट्रीय दहशत–गुन्हेगारी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 7 प्रमुख
दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या 7 आरोपींची छायाचित्रे


दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची मोठी कारवाई

नवी दिल्ली, 16 जून (हिं.स.) : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि ईस्टर्न रेंजच्या संयुक्त पथकाने पाकिस्तान-समर्थित एका मोठ्या आंतरराष्ट्रीय दहशत–गुन्हेगारी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 7 प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली असून, दिल्ली-एनसीआरमध्ये होऊ शकणारे अनेक संभाव्य दहशतवादी हल्ले वेळीच रोखल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या नेटवर्कचे संचालन पाकिस्तानमध्ये बसलेला गँगस्टर-टर्न्ड-टेररिस्ट शहजाद भट्टी आणि त्याचा सहकारी अजमल गुज्जर करत होते. हे मॉड्यूल सोशल मीडिया आणि एन्क्रिप्टेड अॅप्सच्या माध्यमातून भारतातील तरुणांना रिक्रूट करून त्यांना शस्त्रे, ड्रग्ज आणि पैशांच्या आमिषाने फसवत होते.

स्पेशल सेलचे पथक या नेटवर्कवर दीर्घकाळ नजर ठेवून होते. त्यानंतर गेल्या मे महिन्यात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई सुरू करण्यात आली.

पहिली अटक गाझियाबादच्या लोनी येथील मोहित याची करण्यात आली, ज्याला यमुना विहार परिसरातून पकडण्यात आले. त्याच्याकडून बेकायदेशीर पिस्तूल आणि संशयास्पद चॅट्स जप्त करण्यात आले.

पुढील चौकशीत संपूर्ण नेटवर्क उघड झाले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अनास त्यागी, मोहित योगी, दीपक अग्रोला, आरिफ,

करणवीर सिंग, जतन आणि साबिर यांचा समावेश आहे. यापैकी काही आरोपींवर आधीपासूनच अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. या आरोपींकडून 5 अत्याधुनिक सेमी-ऑटोमॅटिक पिस्तुले, 41 जिवंत काडतुसे ,7 मोबाईल फोन आणि एक स्कॉर्पिओ वाहन जप्त करण्यात आलेय.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे नेटवर्क पंजाब सीमेमार्गे ड्रोनद्वारे शस्त्रे आणि नशेचे पदार्थ (हेरोइन/चिट्टा) भारतात आणत होते. तसेच यूपीआय, हवाला आणि दुबईतील खात्यांद्वारे आर्थिक व्यवहार केले जात होते.आरोपींना संवेदनशील ठिकाणांची रेकी करण्याचे निर्देश देण्यात आले होते, ज्याचा उद्देश सामाजिक सलोखा बिघडवणे आणि दहशत पसरवणे हा होता.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की या कारवाईमुळे शस्त्रे आणि ड्रग्ज पुरवठा साखळी उद्ध्वस्त झाली असून अनेक मोठे दहशतवादी हल्ले टाळले गेले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून फरार आरोपी आणि त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.-------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande