फ्रान्समध्ये जी-7 चे उद्घाटन : मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची 16 महिन्यांनी झाली भेट
पॅरीस, 16 जून (हिं.स.) : फ्रान्समध्ये आयोजित 52 व्या जी- 7 शिखर परिषदेचे मंगळवारी उद्घाटन झाले असून, जगातील प्रमुख अर्थव्यवस्था जागतिक आव्हानांवर चर्चा करण्यासाठी एकत्र आल्या आहेत. या परिषदेदरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेताना डोनाल्ड ट्रम्प


पॅरीस, 16 जून (हिं.स.) : फ्रान्समध्ये आयोजित 52 व्या जी- 7 शिखर परिषदेचे मंगळवारी उद्घाटन झाले असून, जगातील प्रमुख अर्थव्यवस्था जागतिक आव्हानांवर चर्चा करण्यासाठी एकत्र आल्या आहेत. या परिषदेदरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एक भेट झाली असून, तिने आंतरराष्ट्रीय कूटनीतीत मोठे लक्ष वेधले आहे.

यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे जोरदार स्वागत केले आणि द्विपक्षीय चर्चेत व्यापार, गुंतवणूक, संरक्षण सहकार्य तसेच जागतिक सुरक्षा या विषयांवर विचारविनिमय केला. ही भेट सुमारे 16 महिन्यांनंतर झालेली प्रत्यक्ष चर्चा मानली जात असून रणनीतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जातेय. पंतप्रधान मोदी सध्या फ्रान्समधील एव्हियन-लेस-बेन्स येथे सुरू असलेल्या जी-7 परिषदेत सहभागी झाले आहेत, जिथे ते विविध देशांच्या प्रमुख नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका देखील घेणार आहेत. भारत या वेळीही जी-7 मध्ये अतिथी देश म्हणून सहभागी होत असून, त्याची वाढती जागतिक भूमिका अधोरेखित होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या व्यापार कराराबाबतही चर्चा पुढे नेण्यावर भर देण्यात आला. तसेच अलीकडील जागतिक सुरक्षा घडामोडी आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील स्थिरतेवरही दोन्ही नेत्यांनी विचारांची देवाणघेवाण केली.

ट्रम्प आणि मोदी यांची ही संभाव्य द्विपक्षीय बैठक बुधवार रोजी होण्याची शक्यता असून, अलीकडील भू-राजकीय तणावांच्या पार्श्वभूमीवर ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

फ्रान्समध्ये आयोजितया परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम आणि अमेरिका सहभागी आहेत, तर युरोपियन युनियन देखील यात सहभागी झाले आहेत.

--------------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande