विकासाचे मोजमाप केवळ जीडीपीने नको, जी-७ परिषदेत पंतप्रधान मोदींचा जगाला स्पष्ट संदेश
नवी दिल्ली , 17 जून (हिं.स.)।फ्रान्समध्ये सुरू असलेल्या जी-७ शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांसमोर आर्थिक विचारसरणीत मोठ्या बदलाची गरज अधोरेखित केली. विकासाचे मोजमाप केवळ जीडीपी किंवा व्यापाराच्या आकडेवारीवरून न करता, तो विका
विकासाचे मोजमाप केवळ जीडीपीने नको, जी-७ परिषदेत पंतप्रधान मोदींनी जगाला स्पष्ट संदेश


नवी दिल्ली , 17 जून (हिं.स.)।फ्रान्समध्ये सुरू असलेल्या जी-७ शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांसमोर आर्थिक विचारसरणीत मोठ्या बदलाची गरज अधोरेखित केली. विकासाचे मोजमाप केवळ जीडीपी किंवा व्यापाराच्या आकडेवारीवरून न करता, तो विकास कोणासाठी, कोणासोबत आणि कोणत्या दिशेने होत आहे, हे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, त्यांनी जी-७च्या आऊटरीच सत्रात ‘सर्वांसाठी संतुलित, सामायिक आणि शाश्वत आर्थिक विकासाला नवसंजीवनी देणे’ या विषयावर भाषण केले. या विषयाला फ्रान्सच्या जी-७ अध्यक्षपदाने प्राधान्य दिले, याचे त्यांनी स्वागत केले.

पारंपरिक आर्थिक चौकटीला आव्हान देत मोदी म्हणाले, “विकासाचे मूल्यांकन केवळ जीडीपी किंवा व्यापाराच्या आकडेवारीवरून करता येणार नाही. खरा प्रश्न विकास किती झाला हा नसून, तो कोणासाठी, कोणासोबत आणि कोणत्या दिशेने झाला, हा आहे. जागतिक धोरणकर्त्यांनी विकासाच्या मूळ उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करून अधिक मानवी आणि सर्वसमावेशक आर्थिक मॉडेल स्वीकारण्याची गरज आहे.”

परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील बैठक सर्वाधिक महत्त्वाच्या चर्चांपैकी एक मानली जात आहे. या बैठकीत जागतिक सुरक्षा, व्यापार, तंत्रज्ञान आणि भू-राजकीय मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच द्विपक्षीय व्यापार कराराला गती देणे, संरक्षण, ऊर्जा आणि महत्त्वाच्या खनिज क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यावरही भर दिला जाणार आहे. याआधी परिषदेत दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक भेट झाली होती. गेल्या १६ महिन्यांनंतर दोन्ही नेत्यांची ही पहिली प्रत्यक्ष भेट ठरली.

सध्या इव्हियन हे शहर जागतिक राजनैतिक घडामोडींचे केंद्र बनले असून, भारत या परिषदेत महत्त्वाचा भागीदार देश म्हणून सहभागी झाला आहे. जागतिक समस्यांच्या निराकरणात भारत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे आंतरराष्ट्रीय समुदायाचे मत असल्याचे मोदी यांनी नमूद केले. आऊटरीच सत्रात बोलताना त्यांनी सांगितले की, जागतिक भागीदारीचा पाया ‘विश्वास’ या तत्त्वावर आधारित असला पाहिजे. भारताच्या ‘मानवता प्रथम’ धोरणाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, भारताच्या विविध जागतिक उपक्रमांमध्ये हीच भूमिका प्रतिबिंबित होते.

पंतप्रधान मोदी यांनी इंटरनॅशनल सोलर अलायन्स, कोअॅलिशन फॉर डिजास्टर रेसिलिएंट इन्फ्रास्ट्रक्चर, ग्लोबल बायोफ्यूल अलायन्स, मिशन लाइफ आणि ‘एक पेड़ माँ के नाम’ या मोहिमेसारख्या उपक्रमांचा उल्लेख केला. भारताच्या आंतरराष्ट्रीय सहकार्याचा पाया प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान ‘वसुधैव कुटुंबकम’ या विचारावर आधारित असल्याचे सांगत, “संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे”, हा संदेश भारत सातत्याने देत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande